Join us

Amruta Fadanvis: 'आपलं मुंबई शहर डोळ्यासमोर उध्वस्त होतंय, याला जबाबदार कोण?'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 8:10 PM

Amruta Fadanvis: मुंबईतील ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला या बहुमजली आग लागली होती. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली. सध्या आग नियंत्रणात असून सर्वांची सुटका करण्यात आली आहे

मुंबई - भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर चांगल्याच एक्टीव्ह असतात. ट्विटरवरुन त्या नेहमीच आपलं परखड मत मांडतात. अनेकदा त्यांना ट्रोलही करण्यात येतं. मात्र, मी माझे विचार मांडतच राहणार असेही त्या ठामपणे सांगतात. सोशल मीडियातून त्या राज्य सरकारवरही टीका करताना आपण यापूर्वी पाहिलं आहे. आताही, त्यांनी मुंबईतीलआगीच्या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईतील ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला या बहुमजली आग लागली होती. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली. सध्या आग नियंत्रणात असून सर्वांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर करत अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. तर, नागरिकांना सवाल केला आहे.  

'आपलं मुंबई शहर आपल्या डोळ्यांसमोर उध्वस्त होत आहे, इमारत बांधताना केलेल्या निष्काळजीपणामुळे आपण आपल्या घरातच मरत आहोत. सरकारी रुग्णालयांनी सुरक्षा नियमांचं पालन न केल्याने आपण रुग्णालयातही मरत आहोत, खड्ड्यांची गर्दी असलेल्या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातही आपण मरत आहोत. याला जबाबदार कोण?' असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला आहे. 

दरम्यान, कमला इमारतीला सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. कमला इमारत २० मजली असून इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग लागली होती. सकाळी सुमारास साडेसातच्या सुमारास आग लागली असून आग लेव्हल ३ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीत जखमी झालेल्या नागरिकांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

टॅग्स :अमृता फडणवीसआगमुंबई