Amruta Fadanvis: 'भाजप अन् संघ पुरोगामी विचारांचा, स्त्रियांचा सर्वाधिक आदरही RSS करते'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 01:56 PM2022-02-04T13:56:54+5:302022-02-04T14:02:03+5:30

अमृता फडणवीस यांनीही बंडातात्यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं.  

Amruta Fadanvis: Rashtriya Swayamsevak Sangh Progressive, RSS Respects Women the Most, Amruta Fadanvis on banda tatya karadkar | Amruta Fadanvis: 'भाजप अन् संघ पुरोगामी विचारांचा, स्त्रियांचा सर्वाधिक आदरही RSS करते'

Amruta Fadanvis: 'भाजप अन् संघ पुरोगामी विचारांचा, स्त्रियांचा सर्वाधिक आदरही RSS करते'

googlenewsNext

मुंबई - सरकारने घेतलेल्या वाईनच्या बाबतीतल्या निर्णयाविरुद्ध गुरुवारी साताऱ्यात बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका असे आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलिसांनी आज त्यांना ताब्यातही घेतलं. दरम्यान, बंडातात्या यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर खालच्या भाषेत टिपण्णी केली होती. यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अमृता फडणवीस यांनीही बंडातात्यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं.  

अमृता फडणवीस यांनी महिला, राजकारण आणि महाविकास आघाडी सरकारवर भाष्य केलं. ''स्त्रियांनी आपल्या देशात अगोदरच खूप भोगलं आहे. महिलांवर टीका करणं चुकीचंच, विशेषत: महिलेवर वैयक्तिक टीका करणं चुकीचंच असल्याचं म्हणत अमृता फडणवीस यांनी बंडातात्या कराडकर यांचे विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तसेच, ही मानसिकतेची बाब असून समाजात लोकांच्या या मानिसकतेत बदल आणायचा असल्याचंही त्यांनी म्हटले. यावेळी, बंडातात्यांचं वक्तव्य हे भाजपा आणि आरएसएसच्या सांगण्यावरुन झाल्यासंदर्भात अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. 

भाजप आणि आरएसएस हे पुरोगामी आहेत. स्त्रियांचा मान ठेवणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे, आणि ते पार पाडतात. मी आरएसएस आणि भाजपच्या लोकांच्या जवळ आहे. पण, मी नॉन पॉलिटीकल आहे. स्त्रीचा सर्वात जास्त आदर कोण करत असेल तर आरएसएस करते, असे मी एका वाक्यात सांगते, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी भाजप आणि आरएसएस यांच्या कार्याचं कौतुक केलं.

मुंबईत वाहतूक कोंडीमुळे 3 टक्के घटस्फोट 

महावसुली आघाडी सरकारची जी कामे सुरु आहेत, जगही बोलतेय की दुजाभाव सुरु आहे. एकाच्या बाबतीत वेगळी कारवाई, दुसऱ्याच्या बाबतीत वेगळी कारवाई केली जातेय. तुम्ही हे विसरून जा की मी देवेंद्र फडणवीस यांची बायको आहे, जेव्हा मी काही बोलते. मलाही रस्त्यांच्या खड्ड्यांचा किंवा अन्य गोष्टींचा त्रास होतो. मी सामान्य स्त्री म्हणून बाहेर पडते. या बायका बोलतात की माझे मानसिक संतुलन ढासळले आहे, तसे काही नाहीय. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे ३ टक्के घटस्फोट होतात ते त्यांच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. तुम्ही यावर बोलणार नसाल तर काय कराल, असेही अमृता यांनी त्यांच्यावरील टीकेवर उत्तर देताना म्हटले आहे.  
 

Web Title: Amruta Fadanvis: Rashtriya Swayamsevak Sangh Progressive, RSS Respects Women the Most, Amruta Fadanvis on banda tatya karadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.