मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं पंजाबी गाणं रिलीज झाले आहे. अमृता फडणवीस यांनी गायनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अमृता फडणवीस यांनी 'मूड बना लेया वे' हे नवं पंजाबी गाणं आणले आहे. सध्या या गाण्याची चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांची या गाण्याला पसंती मिळत आहे. गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी लोकमतशी संवाद साधला.
यावेळी अमृता फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवं पंजाबी गाणं ऐकून प्रतिक्रिया काय होती, यावर प्रतिक्रिया दिली. 'देवेंद्र फडणवीस यांना माझी गाणं आवडतात. त्यांनी हे गाणं पाहिलं आणि 'तुझा यात एक वेगळा पैलू आहे. देवेंद्र फडणवीस यांना गाण्यात खूप आवड आहेत. 'चुरा लिया' हे गाण आमच्या दोघांच आवडीच आहे. त्यांना कधी वेळ मिळेल तेव्हा ते गाणं ऐकत असतात, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
Amruta Fadnavis: राजकीय 'किटी पार्टी'त कुणाला बोलवणार? अमृता फडणवीस म्हणाल्या, मी तर..
‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!’ असे अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे बोल आहेत. अमृता यांनी काही दिवसांपूर्वी या गाण्याचं पोस्टर शेअर केलं होतं. आता हे गाणं प्रदर्शित झालं असून त्याला चांगली पसंती देखील मिळत आहे.
राजकीय 'किटी पार्टी'त कुणाला बोलवणार?
राजकारणाशी निगडीत महिलांची 'किटी पार्टी' जर तुम्ही आयोजित केली तर कुणाकुणाला बोलवणार? असं विचारलं असता त्यांनी सर्वपक्षीय महिला नेत्यांना प्राधान्य देऊ असं मनमोकळेपणानं म्हटलं. "स्त्रियांचं गेट टू गेदर जर मी आयोजित केला तर मी नक्कीच भाजपाच्या महिला नेत्या आहेत त्यांना तर बोलवेनच पण राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या सर्वच पक्षांच्या महिलांना बोलवेन. कारण एक महिला शक्ती जर एकत्रित आली तर मिळून महिलेंच्या तरी समस्यांबाबत काम करू शकू", असं अमृता फडणवीस म्हणाल्या.