Amruta Fadnavis : "ए 'भोगी', काहीतरी शिक आमच्या 'योगीं'कडून"; राज ठाकरेंनंतर अमृता फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 04:29 PM2022-04-28T16:29:38+5:302022-04-28T16:43:19+5:30
Amruta Fadnavis And Uddhav Thackeray : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मुंबई - भोंग्यावरून सुरू असलेलं राजकारण आता चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी योगी सरकारचं कौतुक केलं आहे. तसेच महाराष्ट्रात सत्तेचे भोगी आहेत असं म्हणत ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. "आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'!" असं म्हणत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
"ए 'भोगी', काहीतरी शिक आमच्या 'योगीं'कडून" असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से!" असं म्हटलं आहे. तसेच Maharashtra आणि thursdayvibes हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !#Maharashtra#thursdayvibes
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 28, 2022
राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. ज्य़ामध्ये "उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना" असं म्हटलं आहे.
अमृता फडणवीस यांनी याआधी देखील अनेकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी "थोडक्यात उत्तर द्यावे. (उत्तर दिलेल्या पर्यायांमधून ल्एक किंवा सर्व पर्याय निवडून द्यावे). उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र आमचा ? १. वसूलीच्या ताब्यात, २ विकृत घाडीच्या ताब्यात, ३ लोड शेडिंगच्या ताब्यात, ४. ट्रॅफिक जॅम आणि अव्यवस्थेच्या ताब्यात, ५. गुंडांच्या ताब्यात" असं म्हणत काही सवाल केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.