मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र अधिक तपास करण्यासाठी बिहार पोलीसही मुंबईत दाखल झाले आहे. बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत क्वारंटाईन केल्यानंतर या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. यामध्ये आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे.
अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे, त्यावरून मुंबईने माणुसकीच गमावलीय असं वाटतं असल्याचं म्हटलं आहे. "सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा ज्या तऱ्हेने तपास सुरू आहे, त्यावरून मुंबईने माणुसकी गमावलीय असं मला वाटत आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही" असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अमृता यांनी सोमवारी (3 ऑगस्ट) हे ट्विट केलं आहे. यासोबतच त्यांनी JusticeforSushantSingRajput आणि JusticeForDishaSalian असे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत. बिहारच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केल्यानंतर अनेकांनी पालिका आणि पोलिसांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. मात्र बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना क्वारंटाईन का केलं यामागचं नेमकं कारण आता पालिकेने सांगितलं आहे. BMC ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.
काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी देखील मुंबई पोलीस आणि पालिकेवर निशाणा साधला आहे. पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं असं म्हणत संजय निरुपम यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी सोमवारी एक ट्विट केलं आहे. "मुंबई पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना 15 ऑगस्टपर्यंत क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. चौकशी कशी होणार?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा. तिवारी यांची सुटका करून त्यांना तपास कामात मदत करावी. नाही तर मुंबई पोलिसांवरील संशय आणखी वाढेल" असं ट्विट निरुपम यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Raksha Bandhan 2020: रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरिअर्स बहिणींची घेतली खास भेट
Sushant Singh Rajput Case: 'पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं'; संजय निरुपम यांचा हल्लाबोल
Video - ...अन् पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक फडकला भारताचा झेंडा