अपघात झाला; दीड लाख रुपये मिळाले का?, विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:39 PM2023-08-31T12:39:32+5:302023-08-31T12:39:58+5:30

राज्य शासनाची राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना विमा कंपन्यांमार्फत २० ऑगस्ट २००३ पासून राबविण्यात येत आहे.

An accident occurred; Did you get one and a half lakh rupees?, government help for students to perform surgery | अपघात झाला; दीड लाख रुपये मिळाले का?, विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारची मदत

अपघात झाला; दीड लाख रुपये मिळाले का?, विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारची मदत

googlenewsNext

मुंबई : पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला. शस्त्रक्रिया करावी लागली किंवा अपघाती, आजारपणाने मृत्यू झाला तर, राज्य शासनाच्यावतीने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून पालकांना मदत दिली जाते. राज्य शासनाची राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना विमा कंपन्यांमार्फत २० ऑगस्ट २००३ पासून राबविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचा अपघात वा आजारपणाने मृत्यू झाला तर सानुग्रह अनुदान योजनेतून पालकांना मदत दिली जाते.पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला किवा एखाद् दुसरा अवयव निकामी झाल्यानंतर या योजनेचा लाभ मिळतो. विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाला तरीही मदत मिळते. 

कोणत्या कारणासाठी किती मदत
- शस्त्रक्रिया करावी लागल्यास १ लाख रुपये
- अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपये
- कायमचे अपंगत्व आल्यास ७५ हजार रुपये

रकमेत केली वाढ
  राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत मिळणाऱ्या मदत निधीत आता वाढ करण्यात आली आहे.
  आतापर्यंत या योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास ७५ हजार रुपये आर्थिक मदत मिळत होती. 
  आता ही रक्कम दीड लाख रुपये करण्यात आली आहे. 

ही कागदपत्रे मस्ट
कायमचे अपंगत्व असेल तर डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र, जिल्हा शल्यचिकित्सकांची प्रमाणपत्रावर स्वाक्षरी असावी, जर अपघाती मृत्यू असेल तर एफआयआरची कॉपी, स्थळ मृताचा शवविच्छेदन अहवाल आवश्यक आहे.

अर्ज कुठे करायचा?
   विद्यार्थ्यांबाबतीत असे प्रकार झाले असतील तर पालकाने शाळेत संपर्क साधून प्रस्ताव तयार करून त्या विभागाच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे. 
  तो प्रस्ताव शालेय शिक्षण विभागामार्फत योजना अधिकारी यांच्याकडे येतो. त्यानंतर या प्रस्तावांना मंजुरी मिळून शासनाकडे अनुदान आल्यावर ते पालकांना मिळते. 

Web Title: An accident occurred; Did you get one and a half lakh rupees?, government help for students to perform surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात