Join us

किरीट सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओवरून राजकारण तापणार; ठाकरे गट आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 9:12 AM

Kirit Somaiya Viral Video: माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

मुंबई: भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.या व्हायरल व्हिडिओवरुन ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. 

किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओप्रकरणी अंबादास दानवे म्हणाले की, माझ्याकडे किरीट सोमय्या यांच्याबाबत अनेक तक्रारी असल्याची माहिती आहे. पण माझ्यासाठी तक्रारी करणाऱ्या त्या महिलांची सुरक्षा अधिक महत्वाची आहे. योग्य व्यासपीठावर मी हा विषय मांडणार आहे. या आक्षेपार्ह व्हिडियोची निपक्ष चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील हिसाब तो देना होगा, असं ट्विट करत म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत किरीट सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. किरीट सोमय्यांच्या व्हिडीओमुळे मला धक्का बसला आहे. दुसऱ्यांवर चिखल आणि शिंतोंडे उडविणारे सोमय्या स्वतः चिखलामध्ये लोळत आहे. त्यांचे अनैतिक व्यवहार आणि संबंध बाहेर असतीर तर दुसऱ्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. अशाप्रकारे महिलांसोबत अश्लील प्रकार करत असतील त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. या माणसांचा खरा चेहरा लोकांसमोर आल्याचंही विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या यांचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र

एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप ( जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

अधिवेशनात गाजणार मुद्दा-

सदर संपूर्ण मुद्द्यावरुन एकीकडे विरोधी पक्षातील नेते आक्रमक झालेले असले तरी भाजपकडून कोणत्याही नेत्याचा प्रतिक्रिया अद्याप समोर आलेल्या नाहीत. विरोध किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडिओचा मुद्दा अधिवेशनात देखील मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाबाबत भाजपा नेते काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :किरीट सोमय्यादेवेंद्र फडणवीसभाजपासोशल व्हायरलअंबादास दानवे