मुंबई : एक्सपोपीडिया संस्थेतर्फे ‘अमलगमेशन ११’ या प्रदर्शनाचे आयोजन भूलाभाई देसाई रोड येथील सिमरोझा आर्ट गॅलरी येथे ४ डिसेंबर २०२३ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्ये सांगणाऱ्या विविध कलाकृती एकाच छताखाली प्रेक्षकांना पाहता येतील.
या समूह प्रदर्शनात प्रकाश बाळ जोशी, विनोद व्यंकपल्ली, ओम स्वामी, सोनाली कोरडे, आसित कुमार पटनाईक, योगिनी शर्मा, उमेश कुमार, स्मिता साहू, बी. आर. पंडित, शालू परसरामपुरिया, माया मेनन, श्यामा नदीमपल्ली, राखी शाह, मिनी सुबोथ, कादंबरी मेहता, प्रा. मंगल गोगटे, अलका पांडे, डॉ. प्रिया याबलुरी, सीमा हेडाऊ, प्रियल ठक्कर, सेल्वे सिंग, कौशल पारीख, साक्षी बबारिया, रचना आघा, अविजित रॉय, कविता भंडारी या चित्रकारांच्या कलाकृती प्रदर्शित होणार आहेत.
या प्रदर्शनात सहभागी चित्रकारांनी वैविध्यपूर्ण आणि विविध माध्यमांतील कलाकृती या प्रदर्शनात सादर केल्या आहेत. यामध्ये वास्तव वादी, अमूर्त शैलीतील चित्रे, निसर्ग चित्रे, एक्सप्रेशनिस्ट, फायबर, मिक्स मीडिया अशा विविध माध्यमांतील आशयघन कलाकृतींचा समावेश होतो. चित्र आणि शिल्प अशा दोन्ही माध्यमांतील कलाकृती प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करतील. तसेच दृश्यभानाविषयी प्रेक्षकांना सजग करतील. या कलाकृती पाहताना केवळ रंग, आकार यांचा सुरेख मिलाफच नाही तर कलाकाराची जीवन दृष्टीही कलाकृतीतून पाहता येते आणि या दोहोंचा संगम कलाकारांसाठी उपलब्ध करून देणे हाच या प्रदर्शनाचा उद्देश आहे.