पालघर : पालघर जिल्ह्यातील सफाळे ते विरारदरम्यानच्या समुद्रात भूकंपाचा धक्का जाणवला. शुक्रवारी ५ वाजून ९ मिनिटांनी ३.८ रिक्टर तीव्रतेचा हा धक्का बसला.
मात्र, या धक्क्यामुळे मनुष्य किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. डहाणूपर्यंतच्या किनारी भागातल्या गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. समुद्रात गेलेल्या मच्छीमारांकडून पाण्याच्या पातळीत बदल झाला किंवा काय याबाबत शनिवारी माहिती मिळू शकेल, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.