सर्वधर्मीय आमंत्रण-लग्नपत्रिकांच्या कागद्याच्या लगद्यापासून घडवणार पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

By मनोहर कुंभेजकर | Published: July 28, 2023 05:36 PM2023-07-28T17:36:06+5:302023-07-28T17:36:35+5:30

पर्यावरणपूरक श्रीगणेशाची मुर्ती कागदाच्या लगद्यापासून बनविण्याची ही संकल्पना प्राचार्य  शिक्षणमहर्षि  अजय कौल  व माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर व प्रशांत काशिद यांची होती.

An eco-friendly Ganesha idol will be made from the paper pulp of all-religious invitation-wedding cards | सर्वधर्मीय आमंत्रण-लग्नपत्रिकांच्या कागद्याच्या लगद्यापासून घडवणार पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

सर्वधर्मीय आमंत्रण-लग्नपत्रिकांच्या कागद्याच्या लगद्यापासून घडवणार पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

googlenewsNext

मुंबई - आमंत्रण पत्रिका लग्न पत्रिका व इतर पत्रिका जी आपण कचऱ्यात टाकतो. त्यावर देवदेवतांचे फोटो व धर्माचे चिन्ह असतात त्यामुळे कुठे देवदेवतांचा अपमान होतो. पत्रिका ही हिंदू, मुस्लिम, सिख ,ईसाई कुठल्याही धर्माचे असो जर स्वप्नाक्षय मित्र मंडळाला आम्हाला आणून दिली, तर त्यापासून कागदाच्या लगद्या पासून श्री गणेशाची मूर्ती बनू शकते आणि श्री गणेशाची मूर्ती ही सर्व धर्मीय नागरिकांची असू शकते. एक चांगला आदर्श समाजात होवू शकतो.कागदाच्या लगद्या पासून मूर्ती ८ फूटापासून ते २० फूटांपर्यंत बनू शकते.

स्वप्नाक्षय मित्र मंडळ,सार्वजनिक गणेशोत्सव ,माॅडेल टाऊन, अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील मंडळातर्फे सर्वधर्मिय विघ्नहर्ता श्रीगणेशजी या धर्तीवर आज सकाळी सर्व धर्मीय नागरिकांच्या आमंत्रण, लग्न पत्रिका मुर्तीकाराला सुपूर्द करण्यासाठी कार्यक्रम येथील चाचा नेहरू उद्यानात ठेवण्यात आला होता. गेल्या आठ दहा महिन्यापासून जमा झालेल्या सर्व जातिय धर्मीय निमंत्रण,लग्न पत्रिका व इतर पत्रिका या कार्यक्रमात परिमंडळ ४ चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी ६० किलो पत्रिका मूर्तीकार नरेश मेस्त्री यांच्याकडे सुपूर्द केल्या.

पर्यावरणपूरक श्रीगणेशाची मुर्ती कागदाच्या लगद्यापासून बनविण्याची ही संकल्पना प्राचार्य  शिक्षणमहर्षि  अजय कौल  व माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर व प्रशांत काशिद यांची होती. यंदा मंडळाची कागदापासून सर्व धर्मीय श्रीगणेशाची पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यात येणार आहे.सदर मुर्ती ही ९ फूटाची असेल.या माध्यमातून मुंबईतील सर्व गणेश मंडळानी देखिल  श्रीगणेशाची मुर्ती पर्यावरणपूरक अशी बनवावी असे आवाहन आंबेरकर यांनी केले.

उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी आपल्या भाषणात ही संकल्पना पर्यावरणपूरक व जनजागृतीस पूर्ण हातभार लावणारी असून वाखाणण्याजोगी असल्याची आवर्जून उल्लेख केला.व असेच उपक्रम इतर मंडळानी ही राबवावी असे आवाहन  त्यांनी केले. यावेळी देवेंद्र आंबेरकर, प्रशांत काशिद,मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे, सल्लागार अनिल राऊत, संजिव कल्ले (बिल्लू) अशोक मोरे,उपविभागप्रमुख राजेश शेट्टे,शाखाप्रमुख सिध्देश चाचे, विकी गुप्ता, शौकत विराणी,जयवंत राऊत, अंकुश पाटील, सतिशचन्द्र ठाकूर, प्रकाश जोशी, स्वप्निल शिवेकर ,सूर्यकांत आंबेरकर उपस्थित होते.

या संकल्पने बद्धल माहिती देतांना देवेंद्र आंबेरकर यांनी लोकमतला सांगितले की, सर्व धर्मीयांच्या धार्मिक, आमंत्रण, लग्न पत्रिका या आपण कचरा पेटीत टाकतो.त्यावर देव,देवतांचे चिन्ह असतात.त्यामुळे देव,देवतांचे अवमान होतात.यासाठी गेल्या वर्षी आमच्या मंडळाने सर्व धर्मीय नागरिकांना आवाहन केले  की ,आपण या पत्रिका आम्हाला द्याव्यात.त्यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभागाने आम्हाला निर्माल्य कलश दिला होता.याप्रमाणे सर्व धर्मीय नागरिकांनी पत्रिका या कलशात टाकल्या. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला.या जमलेल्या ६० किलो पत्रिकांपासून पर्यावरण पूरक कागदाच्या लगद्यापासून आमच्या मंडळाची गणेश मूर्ती यंदा साकारणार असल्याची माहिती आंबेरकर यांनी दिली. 

Web Title: An eco-friendly Ganesha idol will be made from the paper pulp of all-religious invitation-wedding cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई