अतीक अहमदसारखी घटना माझ्यासोबतही घडू शकते; समीर वानखेडेंचा गंभीर दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:19 AM2023-05-22T10:19:13+5:302023-05-22T10:20:03+5:30

मी सीबीआयच्या चौकशीला सहकार्य करत आहेत. माझ्या सुरक्षेबाबत मी मुंबई पोलिसांना पत्र लिहणार आहे असं समीर वानखेडेंनी म्हटलं.

An incident like Atiq Ahmed can happen to me too; A serious claim by Sameer Wankhede | अतीक अहमदसारखी घटना माझ्यासोबतही घडू शकते; समीर वानखेडेंचा गंभीर दावा

अतीक अहमदसारखी घटना माझ्यासोबतही घडू शकते; समीर वानखेडेंचा गंभीर दावा

googlenewsNext

मुंबई - कॉर्डेलिया ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांची सध्या सीबीआय चौकशी सुरू आहे. त्याचवेळी समीर वानखेडे यांनी गंभीर दावा करत माझ्यासोबत अतीक अहमदसारखी घटना घडू शकते, त्यामुळे मला मुंबई पोलिसांनी विशेष सुरक्षा पुरवावी अशी मागणी वानखेडेंनी केली आहे. 

समीर वानखेडे म्हणाले की, मी सीबीआयच्या चौकशीला सहकार्य करत आहेत. माझ्या सुरक्षेबाबत मी मुंबई पोलिसांना पत्र लिहणार आहे. सुरक्षेबाबत कमतरता आहे. माझ्याविरोधात खोटी तक्रार आहे. न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना हे प्रकरण कसे आले मला माहिती नाही. मला वारंवार धमक्या येत आहेत. सोशल मीडियावर सातत्याने धमकी दिली जात आहे. अतीक अहमदसारखी घटना घडू शकते त्यामुळे मी जे काही आहे त्याबाबत पत्रातून मुंबई पोलिसांना कळवणार आहे असं त्यांनी म्हटलं. 

काय आहे प्रकरण? 
कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग्स प्रकरणी छापेमारीवेळी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा समीर वानखेडेंवर आरोप आहे. या अनुषंगाने सीबीआय अधिकाऱ्यांनी वानखेडे यांची कसून चौकशी केली. प्रश्नांची सरबत्ती करत शाहरुख खान यांच्याकडून खंडणी मागणे हा आरोप, त्यांची मालमत्ता, परदेशी प्रवास, उत्पन्न व खर्च यात असलेली विसंगती अशा अनेक प्रश्नांबाबत वानखेडेंना विचारणा केली.

सीबीआयने समीर वानखेडे यांना नेमके कोणते प्रश्न विचारले?

  • कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक म्हणून काम करत असताना तुम्ही क्रूझ टर्मिनलवर उपस्थित होता का?
  • कोणत्या आधारे छापा टाकण्यात आला, याची प्राथमिक माहिती काय होती?
  • आर्यन खानबद्दल काही विशिष्ट माहिती होती आणि एजन्सीला त्याच्याशी संबंधित काही इनपुट मिळाले होते का?
  • काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, मनिष भानुशाली या साक्षीदाराने मीडियाला सांगितले होते की, त्याने आर्यन खानला क्रूझवर ड्रग्ज घेऊन जाण्याबाबत माहिती दिली होती, हे खरे आहे का?
  • अधिकारी टर्मिनलवर आर्यन खानची वाट पाहत होते का?
     

Web Title: An incident like Atiq Ahmed can happen to me too; A serious claim by Sameer Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.