इंस्टाग्रामची ओळख, प्रेम अन ब्लँकमेलिंग; चॅटिंगमधून घडला गुन्हा

By मनीषा म्हात्रे | Published: October 23, 2023 09:05 PM2023-10-23T21:05:33+5:302023-10-23T21:05:43+5:30

ओळखीचे रूपांतर प्रेमात होताच दोघांमध्ये अश्लील संवाद रंगला

An Introduction to Instagram, Love and Blackmailing; A crime committed through chatting | इंस्टाग्रामची ओळख, प्रेम अन ब्लँकमेलिंग; चॅटिंगमधून घडला गुन्हा

इंस्टाग्रामची ओळख, प्रेम अन ब्लँकमेलिंग; चॅटिंगमधून घडला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इंस्टाग्रामवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होताच दोघांमध्ये अश्लील संवाद रंगला. पुढे दोघांमधील खासगी व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे पैशांची मागणी वाढताच तरुणीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

वांद्रे परिसरात २९ वर्षीय तरुणी राहण्यास आहे. याप्रकरणी अबू झा अन्सारी (२५) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो वेल्डर म्हणून काम करत असून अंधेरीतील रहिवासी आहे. इंस्टाग्रामवरून तरुणीसोबत त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. व्हिडीओ कॉल दरम्यान खासगी संवादाचे अन्सारीने रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली. काही दिवसाने त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. तरुणीकडून सुरुवातीला १५ हजार उकळले. पुढे आणखीन ७ हजारांची मागणी केली. पैसे दिले नाही तर व्हिडीओ व्हायरल करण्याचा दबाव वाढल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. १ मार्च २०२१ ते २० ऑकटोबर दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. अन्सारीने अशाप्रकारे अन्य तरुणींनाही ब्लॅकमेल केल्याचा संशय असून पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: An Introduction to Instagram, Love and Blackmailing; A crime committed through chatting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.