सहा वर्षांचे उत्कृष्ट आमदार जाहीर, विधानसभेचा कार्यकाळ संपताना झाले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 01:05 PM2024-09-01T13:05:32+5:302024-09-01T13:06:19+5:30

Maharashtra Vidhimandal News: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषणांसाठीचे गेल्या सहा वर्षांमधील पुरस्कार एकाचवेळी जाहीर केले आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असताना पुरस्कारांना  मुहूर्त मिळाला.

An outstanding MLA of six years was praised at the end of his public assembly tenure | सहा वर्षांचे उत्कृष्ट आमदार जाहीर, विधानसभेचा कार्यकाळ संपताना झाले कौतुक

सहा वर्षांचे उत्कृष्ट आमदार जाहीर, विधानसभेचा कार्यकाळ संपताना झाले कौतुक

मुंबई - विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषणांसाठीचे गेल्या सहा वर्षांमधील पुरस्कार एकाचवेळी जाहीर केले आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असताना पुरस्कारांना  मुहूर्त मिळाला. लवकरच पुरस्कारांचे व वितरण करण्यात येणार आहे.

वर्षनिहाय पुरस्कार असे...

२०१८-१९ : विधानसभा :
उत्कृष्ट संसदपटू - बाळासाहेब थोरात (काँग्रेस), डॉ. संजय कुटे (भाजप),
उत्कृष्ट भाषण : नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), पराग अळवणी (भाजप)

विधान परिषद :
उत्कृष्ट संसदपटू - डॉ. नीलम गोहे (शिवसेना), निरंजन डावखरे (भाजप),
उत्कृष्ट भाषण : हुस्नबानू खलिफे (काँग्रेस), सुजितसिंह ठाकूर (भाजप)

२०१९-२० - विधानसभा :
उत्कृष्ट संसदपटू - प्रकाश आबिटकर (शिवसेना), आशिष शेलार (भाजप),
उत्कृष्ट भाषण : सुनील प्रभू (शिवसेना), दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी)

विधान परिषद :
उत्कृष्ट संसदपटू - सतीश चव्हाण (राष्ट्रवादी), अनंत गाडगीळ (काँग्रेस)
उत्कृष्ट भाषण : रामहरी रूपनवार (काँग्रेस), श्रीकांत देशपांडे (अपक्ष)

२०२०-२१ : विधानसभा :
उत्कृष्ट संसदपटू - अमित साटम (भाजप), आशिष जयस्वाल (अपक्ष),
उत्कृष्ट भाषण : प्रताप सरनाईक (शिवसेना), प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)

विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू - प्रवीण दरेकर (भाजप), विनायक मेटे(शिवसंग्राम)
विधान परिषद : उत्कृष्ट भाषण - मनीषा कायंदे (शिवसेना), बाळाराम पाटील (शेकाप)

२०२१-२२ : विधानसभा
उत्कृष्ट संसदपटू संजय शिरसाट (शिवसेना), प्रशांत बंब (भाजप),
उत्कृष्ट भाषण - सरोज अहिरे (राष्ट्रवादी), सिद्धार्थ शिरोळे (भाजप).

विधान परिषद :
उत्कृष्ट संसदपटू - अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी), सदाभाऊ खोत (भाजप)
उत्कृष्ट भाषण : गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना), विक्रम काळे (राष्ट्रवादी)

२०२२-२३ : विधानसभा :
उत्कृष्ट संसदपटू भरत गोगावले (शिवसेना), चेतन तुपे (राष्ट्रवादी), समीर कुणावार (भाजप)
उत्कृष्ट भाषण - यामिनी जाधव, (शिवसेना), अभिमन्यू पवार (भाजप)

विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू - प्रसाद लाड (भाजप), महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) उत्कृष्ट भाषण - बाबाजानी दुर्रानी (राष्ट्रवादी), प्रज्ञा सातव (काँग्रेस)

२०२३-२४ : विधानसभा :
उत्कृष्ट संसदपटू - रमेश बोरनारे (शिवसेना), अमिन पटेल (काँग्रेस), राम सातपुते (भाजप)
उत्कृष्ट भाषण - कुणाल पाटील (काँग्रेस), श्वेता महाले (भाजप), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी),

विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), गोपीचंद पडळकर (भाजप), रमेश पाटील (भाजप)
उत्कृष्ट भाषण : आमशा पाडवी (शिवसेना), श्रीकांत भारतीय (भाजप),

Web Title: An outstanding MLA of six years was praised at the end of his public assembly tenure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.