Join us  

सहा वर्षांचे उत्कृष्ट आमदार जाहीर, विधानसभेचा कार्यकाळ संपताना झाले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 1:05 PM

Maharashtra Vidhimandal News: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषणांसाठीचे गेल्या सहा वर्षांमधील पुरस्कार एकाचवेळी जाहीर केले आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असताना पुरस्कारांना  मुहूर्त मिळाला.

मुंबई - विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषणांसाठीचे गेल्या सहा वर्षांमधील पुरस्कार एकाचवेळी जाहीर केले आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असताना पुरस्कारांना  मुहूर्त मिळाला. लवकरच पुरस्कारांचे व वितरण करण्यात येणार आहे.

वर्षनिहाय पुरस्कार असे...

२०१८-१९ : विधानसभा :उत्कृष्ट संसदपटू - बाळासाहेब थोरात (काँग्रेस), डॉ. संजय कुटे (भाजप),उत्कृष्ट भाषण : नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), पराग अळवणी (भाजप)

विधान परिषद :उत्कृष्ट संसदपटू - डॉ. नीलम गोहे (शिवसेना), निरंजन डावखरे (भाजप),उत्कृष्ट भाषण : हुस्नबानू खलिफे (काँग्रेस), सुजितसिंह ठाकूर (भाजप)

२०१९-२० - विधानसभा :उत्कृष्ट संसदपटू - प्रकाश आबिटकर (शिवसेना), आशिष शेलार (भाजप),उत्कृष्ट भाषण : सुनील प्रभू (शिवसेना), दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी)

विधान परिषद :उत्कृष्ट संसदपटू - सतीश चव्हाण (राष्ट्रवादी), अनंत गाडगीळ (काँग्रेस)उत्कृष्ट भाषण : रामहरी रूपनवार (काँग्रेस), श्रीकांत देशपांडे (अपक्ष)

२०२०-२१ : विधानसभा :उत्कृष्ट संसदपटू - अमित साटम (भाजप), आशिष जयस्वाल (अपक्ष),उत्कृष्ट भाषण : प्रताप सरनाईक (शिवसेना), प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)

विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू - प्रवीण दरेकर (भाजप), विनायक मेटे(शिवसंग्राम)विधान परिषद : उत्कृष्ट भाषण - मनीषा कायंदे (शिवसेना), बाळाराम पाटील (शेकाप)

२०२१-२२ : विधानसभाउत्कृष्ट संसदपटू संजय शिरसाट (शिवसेना), प्रशांत बंब (भाजप),उत्कृष्ट भाषण - सरोज अहिरे (राष्ट्रवादी), सिद्धार्थ शिरोळे (भाजप).

विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू - अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी), सदाभाऊ खोत (भाजप)उत्कृष्ट भाषण : गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना), विक्रम काळे (राष्ट्रवादी)

२०२२-२३ : विधानसभा :उत्कृष्ट संसदपटू भरत गोगावले (शिवसेना), चेतन तुपे (राष्ट्रवादी), समीर कुणावार (भाजप)उत्कृष्ट भाषण - यामिनी जाधव, (शिवसेना), अभिमन्यू पवार (भाजप)

विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू - प्रसाद लाड (भाजप), महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) उत्कृष्ट भाषण - बाबाजानी दुर्रानी (राष्ट्रवादी), प्रज्ञा सातव (काँग्रेस)२०२३-२४ : विधानसभा :उत्कृष्ट संसदपटू - रमेश बोरनारे (शिवसेना), अमिन पटेल (काँग्रेस), राम सातपुते (भाजप)उत्कृष्ट भाषण - कुणाल पाटील (काँग्रेस), श्वेता महाले (भाजप), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी),विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), गोपीचंद पडळकर (भाजप), रमेश पाटील (भाजप)उत्कृष्ट भाषण : आमशा पाडवी (शिवसेना), श्रीकांत भारतीय (भाजप),

टॅग्स :विधान भवनविधानसभाविधान परिषद