जगात अजूनही शिल्लक आहे माणुसकी; बालकाच्या उपचारांसाठी अज्ञात दानशूराची ११ कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 08:57 AM2023-02-24T08:57:42+5:302023-02-24T08:57:59+5:30

१७ काेटींचे औषध अमेरिकेतून मागविणार

An unknown person has donated more than 11 crore rupees to one-and-a-half-year-old boy Nirvan Sarang | जगात अजूनही शिल्लक आहे माणुसकी; बालकाच्या उपचारांसाठी अज्ञात दानशूराची ११ कोटींची मदत

जगात अजूनही शिल्लक आहे माणुसकी; बालकाच्या उपचारांसाठी अज्ञात दानशूराची ११ कोटींची मदत

googlenewsNext

मुंबई - मूळ केरळचे असलेले; पण आता मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या सारंग मेनन व आदिती या दाम्पत्याच्या निर्वाण या अवघ्या पंधरा महिन्यांच्या बालकाला स्पायनल मस्क्युलर एट्रोफी (एसएमए) हा दुर्धर आजार आहे. त्याच्या उपचारांसाठी एका अज्ञात दानशूराने या दाम्पत्याला तब्बल ११ कोटी रुपयांची मदत केली आहे. निर्वाणावरील जीन रिप्लेसमेंट उपचारांसाठी लागणाऱ्या झोल्जेन्स्मा या औषधाच्या एका डोसची किंमत १७.५ कोटी रुपये असून, तितकी रक्कम अज्ञात दानशूर व्यक्ती व इतरांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे जमा झाली आहे. आता औषध अमेरिकेतून मागविण्यात येणार आहे. 

निर्वाणला एसएमए टाइप २ हा आजार झाला असल्याचे ७ जानेवारी रोजी निदान झाले. या आजारावरील उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार असे कळल्याने ते आणखी हबकले. या उपचारासाठी लागणारे व जगातील अतिशय महागड्या औषधांपैकी एक असलेले झोल्जेन्स्मा ते अमेरिकेतून मागविण्यासाठी सारंग यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाशी संपर्क साधला. हे औषध भारतात येण्यासाठी २० दिवस लागतील.

जगात अजूनही शिल्लक आहे माणुसकी
सारंग मेनन यांनी सांगितले की, आमच्या मुलाच्या उपचारांसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून भरघोस मदत मिळाली. ही माणसे देवासारखी आमच्या पाठीशी उभी राहिली. जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे याचे दर्शन झाले. या घटनेसंदर्भात सारंग यांनी फेसबुकवर एक पोस्टही लिहिली आहे.

जीएसटी, कस्टम ड्यूटी न लावण्याची विनंती
औषधावर आकारण्यात येणारे जीएसटी, कस्टम ड्यूटी लावू नये, अशी विनंती केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी इडन यांच्यामार्फत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना करण्यात आली आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मागितली मदत
मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळण्याकरिता मिलाप व इम्पॅक्टगुरु या दोन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अकाउंट उघडली. त्यातून त्यांना १७.५ कोटी रुपयांची मदत मिळालेली आहे.

Web Title: An unknown person has donated more than 11 crore rupees to one-and-a-half-year-old boy Nirvan Sarang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.