Join us

Raj Thackeray: शिवसेना पक्ष योग्य माणसांच्या हाती गेला का? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 1:10 PM

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राजभाषा महोत्सव आयोजित केला आहे.

मुंबई - राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर बरची राजकीय उलथापालथ झाली. तसं पाहिलं तर या निवडणुकांच्या घोषणापूर्वीच पक्षांतराच्या घटनांनी राजकीय समीकरणचं बदलली होती. मात्र, निकालानंतर अनपेक्षित अशी महाविकास आघाडी झाली. दरम्यान, न्यायलयीन राजकीय लढाईही महाराष्ट्राने पाहिली. त्यातच, कहार म्हणजे अडीच वर्षानंतर शिवसेनेत झालेला सर्वात मोठा बंड. त्यामुळे, महाराष्ट्राच्या राजकारणावरील लोकांचा विश्वासच उठल्याची चर्चा सातत्याने होत असते. त्याच, अनुषंगाने मनसेप्रमुखराज ठाकरे यांना सध्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, राज ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर दिलंय. 

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राजभाषा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. ठाकरे काय वाचतात? असा मुलाखतीचा विषय होता. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी एका शब्दात मी चेहरे वाचतो, असं म्हटलं आणि उपस्थितांचा टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. मराठी भाषेबद्दल आणि आवडीच्या पुस्तकांबद्दल राज ठाकरे माहिती दिली.  

सध्या शिवसेनेतील बंडाळी आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयासंबंधी राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. हे चागंलं झालं का, योग्य माणसांच्या हाती शिवसेना गेली का, तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर, राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. मला कुठलाही टीझर, ट्रेलर सांगायचा नाही. मी २२ तारखेलाच सिनेमा दाखवणार आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले. तर, थोडक्यात उत्तर देताना, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, असे राज ठाकरेंनी म्हटले. कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठल्या पक्षात जाईल, हे सांगताच येत नाही. मी विधिमंडळ सभागृहात बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमाला गेलो होतो, त्यावेळीही मला कोण कोणत्या पक्षात आहे, हेच कळत नव्हत, असे राज यांनी म्हटले. 

राजू पाटलांना विचारायचंय

मला आमच्या राजू पाटील यांना विचारायचंही आहे की, घेता का. एकदा घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आमचं काय जळतं ते. दिवसरात्र आम्ही बर्नॉल लावत असतो, असं प्रत्युत्तर राज यांनी दिलंय. त्यावर, तुम्ही सोशल मीडियातील मिम्स पाहता का, असा प्रश्न मुलाखतकाराने विचारला. त्यावर, होय मी मिम्स पाहतो, एन्जॉय करतो. मला ते आवडतात, असे म्हणत राज ठाकरेंनी एका विनोदी मिम्सही सांगितला.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेराजू पाटीलशिवसेना