आनंद भंडारे यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:17 AM2017-08-18T02:17:27+5:302017-08-18T02:17:29+5:30
मराठी अभ्यास केंद्राचे माहिती अधिकार गटाचे प्रमुख आनंद भंडारे यांना पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नंस ट्रस्टचा २०१७चा नारायण वर्मा पुरस्कार जाहीर झाला
मुंबई : मराठी अभ्यास केंद्राचे माहिती अधिकार गटाचे प्रमुख आनंद भंडारे यांना पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नंस ट्रस्टचा २०१७चा नारायण वर्मा पुरस्कार जाहीर झाला आहे. पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नंस ट्रस्टच्या वतीने दरवर्षी समाजासाठी लक्षणीय काम करणाºया व्यक्तीचा पुरस्कार देऊन सत्कार केला जातो. यंदा हा मानाचा पुरस्कार मराठी अभ्यास केंद्राच्या आनंद भंडारे यांना ‘माझा प्रभाग, माझा नगरसेवक’ या अहवाल मालिकेसाठी मिळाला आहे.
नगरसेवकांनी त्यांना मिळणाºया निधीतून लोकहिताची कोणती कामे केली आहेत याचा आकडेवारीनिशी आनंद भंडारे यांनी मागोवा घेतला. सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या कामात असलेला व्यक्तिगत धोका लक्षात घेऊनही आनंद भंडारे यांनी फक्त आपला अहवाल पूर्ण न करता मुंबई शहरातल्या विविध भागातल्या पंधरा कार्यकर्त्यांच्या मदतीने पंधरा नगरसेवकांच्या मूल्यमापनाचे अहवाल तयार केले. शुक्रवार, १८ आॅगस्ट रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता के.सी. महाविद्यालयाच्या सभागृहात आनंद भंडारे यांना हा पुरस्कार देण्यात
येणार आहे.