मुंबई : ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा दिव्य संदेश विश्वातील तमाम मानवजातीच्या मनावर बिंबविणारे आणि त्यांच्या कल्याणासाठी निरपेक्ष वृत्तीने आयुष्य वेचणारे थोर तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक सद्गुरू श्री. वामनराव पै यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक असा ‘आनंद महोत्सव’ शुक्रवारपासून रविवार, २९ आॅक्टोबरपर्यंत पनवेल येथे जीवनविद्या मिशनतर्फे साजरा होत आहे. ‘आनंद वाटा, आनंद लुटा’ या विषयावर आधारित हा भव्य समाज प्रबोधन महोत्सव सर्कस मैदान, खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी ५ ते ९ या वेळात आयोजित करण्यात आला आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी जीवनविद्या मिशनचे प्रबोधक प्रल्हाद पै यांच्याशी आमचे प्रतिनिधी मनोहर कुंभेजकर यांनी केलेली बातचीत.प्रश्न : आनंद महोत्सवाची नेमकी संकल्पना काय आहे?उत्तर : सद्गुरू वामनराव पै यांचा जन्म दिवस तिथीनुसार दिवाळीत बलिप्रतिपदेला असतो. मात्र, दिवाळीत सर्व जण कुटुंबासह उत्सव साजरा करीत असल्याने तिथीपेक्षा अतिथी महत्त्वाचा मानून त्यानंतर येणाºया आठवड्यात हा आनंद महोत्सव साजरा करण्यात येत आहे. जीवनात गमक आनंदी राहण्याबरोबरच आनंद वाटण्यात आहे. त्यातूनच आपले जीवन खºया अर्थाने सुखी होते. आनंद वाटल्यामुळे सत्कर्म होते. ‘आनंद वाटा, आनंद लुटा’ ही असामान्य साधना सद्गुरू श्री. वामनराव पै यांनी आपल्या लाखो शिष्यवर्गाला दिली. त्यामुळे ‘आनंद वाटा, आनंद लुटा’ हाच महोत्सवाचा विषय असून, मला खात्री आहे हा विषय ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात खºया आनंदाची दिवाळी सुरू होणार आहे.प्रश्न : आनंद महोत्सवाचे स्वरूप काय आहे?उत्तर : महोत्सवादरम्यान दररोज सायंकाळी ५ ते ७. ३० या वेळेत उपासना यज्ञ संगीत जीवनविद्या, सुख संवाद, नवनाट्य, रिंगण, तबला वादन व बालसंस्कार केंद्रातील मुलांचे असे प्रबोधनात्मक कार्यक्र म होणार आहेत. शुक्रवारी रात्री ८ वाजता माजी प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत निंबाळकर यांचे प्रबोधन झाले, तर २८ ते २९ आॅक्टोबरला रात्री ८ वाजता मी स्वत: ‘आनंद वाटा, आनंद लुटा’ या विषयावर बोलणार आहे.प्रश्न : जीवनविद्या मिशन या संस्थेचा विस्तार सर्वदूर होत आहे, त्याबद्दल काय सांगाल?उत्तर : जीवनविद्या मिशन संस्थेचा विस्तार महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात वेगाने होत आहे. महाराष्टÑात आमची ७० केंद्रे असून बेळगाव, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार या राज्यात देखील आमची उपकेंद्रे आहेत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका,आॅस्ट्रेलिया येथे देखील आमची केंद्रे आहेत.प्रश्न : कोणते सामाजिक उपक्र म जीवनविद्या मिशन राबवत आहे?उत्तर : समाजातील सर्व घटकांचे प्रबोधन हे आमचे प्राथमिक कार्य आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून जीवनविद्या मिशन विविध सामाजिक उपक्र म राबवित आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी ग्राम समृद्धी अभियान सुरू केले आहे. तसेच स्वच्छता अभियान, अवयवदान अभियान, स्त्री सन्मान अभियान, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अभियान, वृक्षारोपण व पर्यावरण स्नेही स्वच्छ गाव अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती अभियान, संस्कार शिक्षणातंर्गत बाल व युवा मनावर संस्कार, विद्यार्थी मार्गदर्शन अभियान आदी विविध सामाजिक विषयांवर मिशन जोरदार कार्य करत आहे.प्रश्न : समाज प्रबोधनाचे कार्य आपण कसे करता?उत्तर : दर महिन्याच्या तिसºया रविवारी सकाळी १० ते ११ या वेळात मी सोशल मीडियाच्या माध्यमातून यू ट्यूबवर थेट प्रबोधन करतो. यामध्ये देशासह अमेरिका व आॅस्ट्रेलिया येथील सुमारे हजारो नागरिक एकाच वेळी इंटरनेटवर या कार्यक्र मात आवर्जून सहभागी होतात. तर दर रविवारी सकाळी ८ वाजता सह्याद्री वाहिनीवर सद्गुरू वामनराव पै यांचे जीवनविद्येवर प्रवचने होतात. कर्जत येथील जीवनविद्या ज्ञानपीठ आणि कामोठे येथील जीवनविद्या ज्ञान साधना केंद्रात गर्भ संस्कार, उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवनविद्येचा, ‘तरु णांनो करा सोने आयुष्याचे’, कौटुंबिक सौख्य, कॉर्पोरेट कोर्सेस, आपले सुख आपल्या हातात असे विविध प्रबोधन वर्ग सुरू आहेत.प्रश्न : जीवनविद्या मिशनच्या कार्याला विदेशात कसा प्रतिसाद मिळतो?उत्तर : आमच्या कार्याला विदेशातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेत आमचे बाल संस्कार केंद्र आहे. अमेरिकेत दर रविवारी सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत तर आॅस्ट्रेलियात दर मंगळवारी दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत तेथील नागरिकांशी मी संवाद साधतो व याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.विश्वाचे कल्याण झाले पाहिजे व नवीन पिढी घडली पाहिजे हे जीवन विद्या मिशनचे ध्येय आहे. मन:स्थिती बदलली तर परिस्थिती नक्की बदलेल असा मला ठाम विश्वास असून, आमचे कार्य दिवसेंदिवस वाढतच राहील, यात शंका नाही.जीवनविद्या मिशनने अनेक शाळा दत्तक घेतल्या असून, या माध्यमातून शिक्षकांना विद्यार्थी जडणघडणीसाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते, जेणेकरून शिक्षक विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कला शिकवून आदर्श विद्यार्थी घडवीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी जीवनविद्येचे अनमोल मार्गदर्शकवर्ग संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत. या प्रबोधनवर्गांना विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.ही सद्गुरूंनी निर्माण केलेली विश्वप्रार्थना रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर येथील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी रोज म्हणावी आणि ही प्रार्थना फलकावर लिहिली जावी अशा सूचना शिक्षण विभागाने काढल्या आहे.तर आपल्या सर्वांचे रक्षण करणाºया पोलिसांसाठी जीवनविद्या मिशन कृतज्ञतेच्या भावातून कर्जत येथील केंद्रात विनामूल्य वर्ग आयोजित करते व त्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस खात्याने अध्यादेश देखील काढला आहे.तसेच सुमारे ४ लाख परिचारिकांना (नर्सेसना) देखील मिशनतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अवयवदानाचे कार्य देखील चांगले सुरू असून, आतापर्यंत आमच्या प्रयत्नाने सुमारे ६०,००० नागरिकांनी मरणोत्तर अवयवदानाला आपली संमती दिली आहे.‘हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,सर्वांचं भलं कर, रक्षण करआणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे’.
‘आनंद वाटा, आनंद लुटा’ संकल्पनेवर आधारित आनंद महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 2:33 AM