आनंद तेलतुंबडे सीपीआय (माओवादी) चे सक्रिय सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:07 AM2021-03-10T04:07:31+5:302021-03-10T04:07:31+5:30

एल्गार परिषद प्रकरण ‘एनआयए’ची विशेष न्यायालयाला माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले ...

Anand Teltumbde is an active member of the CPI (Maoist) | आनंद तेलतुंबडे सीपीआय (माओवादी) चे सक्रिय सदस्य

आनंद तेलतुंबडे सीपीआय (माओवादी) चे सक्रिय सदस्य

Next

एल्गार परिषद प्रकरण ‘एनआयए’ची विशेष न्यायालयाला माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे हे सीपीआय (माओवादी)चे सक्रिय सदस्य आहेत आणि त्यांच्या संघटनेच्या कामात ते खोलवर गुंतले आहेत, अशी लेखी माहिती ‘एनआयए’ने विशेष न्यायालयापुढे सादर केली. ‘एनआयए’ने २६ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयात लेखी युक्तिवाद सादर केला. त्याची प्रत मंगळवारी प्रसारमाध्यमांना उपलब्ध झाली.

जानेवारी महिन्यात आनंद तेलतुंबडे यांनी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तपास यंत्रणेकडे आपल्याविरोधात पुरावे नाहीत. आपण अन्य लोकांना देशाविरुद्ध युद्ध छेडण्याचे प्रोत्साहन देत असल्याचा तपास यंत्रणेचा आरोप तथ्यहीन आहे, असे तेलतुंबडे यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेला विरोध करताना एनआयएने न्यायालयाला सांगितले की, आपल्याविरोधात काहीही पुरते नाहीत, हा तेलतुंबडे यांचा दावा अत्यंत चुकीचा आहे. उलटपक्षी तेलतुंबडे सीपीआय (माओवादी) चे सक्रिय सदस्य आहेत, हे सिद्ध करणारे अनेक पुरावे आहेत. संरक्षण दिलेल्या साक्षीदारांनी जबाबात म्हटले आहे की, तेलतुंबडे आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहत होते; पण परदेशी माओवाद्यांचे साहित्य मेमरी कार्डमध्ये सेव्ह करून सीपीआय (माओवादी) च्या केंद्रीय समितीच्या परवानगीनंतर त्याचा वापर प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येत असे.

या प्रकरणातील फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांना आनंद तेलतुंबडे चोरून भेटत असत. तसेच त्यांच्याविरोधात इलेक्ट्रॉनिक पुरावेही आहेत, असे एनआयएने लेखी युक्तिवादात म्हटले आहे.

दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथील स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजिल याच्याविरोधात आयपीसी कलम १५३ (ए) (धर्म, वर्ण व ठिकाण यावरून भिन्न गटांत शत्रुत्व निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव व एबीव्हीपीचे माजी सदस्य प्रदीप गावडे यांनी शरजिलविरोधात पोलिसांकडे तक्रार केली.

तक्रारीनुसार, शरजिल याने हिंदू समाज, भारतीय न्यायव्यवस्था आणि लोकसभेबाबत आक्षेपार्ह भाष्य केले. उस्मानी याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. भाषण करण्यापूर्वी किंवा नंतर घटनास्थळावर असंतोष किंवा हिंसाचार झाला नाही. समाजातील जातीय सलोखा बिघडवण्यासाठी आणि फौजदारी न्यायव्यवस्थेचा ससेमिरा पाठी लावून खुलेपणाने व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर आळा घालण्यासाठी असे गुन्हे नोंदविण्यात येतात, असे उस्मानीने याचिकेत म्हटले आहे.

पुण्यात कोरेगाव-भीमा लढाईच्या वर्धापनदिनानिमित्त ३० जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शांततापूर्ण मेळाव्यात आपण भाषण केले, असे उस्मानी यांनी याचिकेत म्हटले आहे. आपल्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा तथ्यहीन आहे. माझ्या भाषणातील काही विधाने संदर्भ न देता उचलण्यात आली आहेत. माझ्या भाषणात मी सद्य:स्थितीतील समाजरचना आणि समस्या यांबाबत बोललो आहे आणि या समस्येवर उपायही सांगितला आहे. केवळ लोकांना समस्या समजावी, यासाठी काही कठोर शब्द वापरले आहेत, असे उस्मानी याने याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Anand Teltumbde is an active member of the CPI (Maoist)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.