नॅशनल पार्कमधील आनंद वाघाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 02:42 AM2020-07-11T02:42:04+5:302020-07-11T02:42:26+5:30

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आनंद या नर वाघाचा गुरुवारी मृत्यू झाला. व्याघ्र सफारीत असणारा हा वाघ १० वर्षांचा होता. आनंद वाघाच्या खालच्या ओठावर कर्करोगाची गाठ निर्माण झाली होती.

Anand tiger dies in national park | नॅशनल पार्कमधील आनंद वाघाचा मृत्यू

नॅशनल पार्कमधील आनंद वाघाचा मृत्यू

Next

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आनंद या नर वाघाचा गुरुवारी मृत्यू झाला. व्याघ्र सफारीत असणारा हा वाघ १० वर्षांचा होता. आनंद वाघाच्या खालच्या ओठावर कर्करोगाची गाठ निर्माण झाली होती. या गाठीमुळे मागील महिनाभर हा वाघ अत्यंत त्रस्त होता. मागील आठवड्याभरापासून त्याने अन्नग्रहणदेखील बंद केले होते. पशुवैद्यकांनी त्याला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु तरीदेखील या वाघाचा मृत्यू झाला.
काही दिवसांपर्ू्वी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ पथकाने या वाघाची तपासणी करून बायोप्सी केली होती. या तपासणीमध्ये त्याच्या ओठाजवळ कर्करोगाची अत्यंत घातक समजली जाणारी गाठ तयार झाली असल्याचे निष्पन्न झाले होते.
मागील काही दिवसांपासून तो काहीच खात नसल्यामुळे त्याला आयव्ही फ्लूइड्स आणि सप्लिमेंट्स देण्यात येत होते. परंतु अखेर आनंद वाघाचा गुरुवारी पहाटे मृत्यू
झाला.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मागील वर्षी यश वाघाचा मृत्यू झाला होता. आता या व्याघ्र सफारीत सुलतान हा नर वाघ व इतर चार वाघिणी आहेत.

Web Title: Anand tiger dies in national park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.