LIVE: जुहू चौपाटीवर विसर्जनाला गालबोट, १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 06:05 PM2023-09-27T18:05:10+5:302023-09-28T19:22:41+5:30

Ganesh Visarjan 2023 (Ganpati Visarjan) Mumbai Live Updates :  मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गणेश गल्लीतील गणपती ...

anant chaturdashi ganesh utsav ganpati visarjan 2023 lalbaugcha raja ganesh galli chinchpoklicha chintamani mumbai live updates | LIVE: जुहू चौपाटीवर विसर्जनाला गालबोट, १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

LIVE: जुहू चौपाटीवर विसर्जनाला गालबोट, १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

googlenewsNext

Ganesh Visarjan 2023 (Ganpati Visarjan) Mumbai Live Updates :  मुंबईतीलगणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गणेश गल्लीतील गणपती म्हणजेच मुंबईच्या राजा, तेजुकाया मेन्शन, परळचा राजा आणि लालबागचा राजा असे मुंबईतील महत्वाचे गणपती मार्गस्थ झाले आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लालबाग परिसरात जनसागर लोटला आहे. पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे. मुंबईत १३ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, ७० हजारांहून  अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. नैसर्गिक विसर्जनस्थळी तसेच कृत्रिम तलावांच्या ठिकाणी पालिकेने विसर्जनाची तयारी केली आहे. वाहतूक पोलिसांनी गिरगाव, दादर, जुहू, मालाड, मालवणी टी जंक्शन आणि गणेशघाट पवई यासारख्या महत्त्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

 गणेश विसर्जन मिरवणुकीचे LIVE UPDATES: 

LIVE

Get Latest Updates

08:15 PM

मुंबईचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला…

08:00 PM

खेतवाडीचा लंबोदर गिरगाव चौपाटीवर पोहोचला…

07:08 PM

07:05 PM

जुहू चौपाटीवर एकाचा मृत्यू

जुहू चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी पाण्यात गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, स्वयंसेवकांनी मुलाला रुग्णालयात दाखल केलं पण उपचाराआधीच मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती

06:45 PM

06:26 PM

मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीवर...

मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणेश गल्लीच्या गणपतीचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन

06:25 PM

05:55 PM

लालबागचा राजा श्रॉफ बिल्डिंगजवळ पोहोचला, थोड्याच वेळात राजावर होणार पुष्पवृष्टी; डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण पाहण्यासाठी तुफान गर्दी

05:38 PM

04:50 PM

04:24 PM

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस

मुंबई उपनगरांत सखल भागांत पाणी साचायला सुरुवात, पावसाची दमदार हजेरी

03:58 PM

ढोलताशांच्या गजरात, विजांचाही कडकडाट..

मुंबईत विसर्जन मिरवणुकीला पावसाचीही कृपा'वृष्टी', वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

03:35 PM

03:31 PM

03:27 PM

गणेश गल्ली गणपतीच्या मिरवणुकीत छत्रपती शिवरायांनी दिला महत्वाचा संदेश

01:14 PM

लालबागचा राजा कुठे पोहोचला?

लालबागचा राजा सध्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ असून राजाला मंडळाकडून मानवंदना दिली जात आहे. शिवराज्याभिषेकाचं ३५० व्या वर्षाचे औचित्य साधून खास तयारी करण्यात आली आहे.  

01:07 PM

तेजुकाया मेन्शनचा गणपती विसर्जन मिरवणूक...

11:59 AM

नरेपार्कच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू

11:23 AM

लालबागच्या राजाची उत्तरपूजा अन् महाआरती...

11:23 AM

11:17 AM

मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी झाली तो क्षण...

 

10:55 AM

10:36 AM

लालबागच्या राजाच्या महाआरतीला सुरुवात, थोड्याच वेळात मिरवणुकीलाही सुरुवात होणार...

10:15 AM

10:08 AM

09:57 AM

मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीत शिवरायांची पालखी..

09:49 AM

09:42 AM

गणेश गल्लीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष...

09:36 AM

लालबागच्या राजासमोर कोळी नृत्याचं सादरीकरण...

09:03 AM

मुंबईचा राजा निघाला...

06:17 PM

अनंत चतुर्दशी निमित्त रस्ते वाहतुकीत बदल

कोणते रस्ते बंद असतील?
नाथालाल पारेख मार्ग, जे एस एस रोड, विठ्ठलभाई पटेल बाबासाहेब जयकर मार्ग, कावसजी पटेल मार्ग, टँक रोड, नानूभाई देसाई रोड, पीडी मेलो रोड, दादासाहेब भडमकर मार्ग,  सँडहर्स्ट रोडचा मार्ग,  एन. ए. पुरंदरे मार्ग ते ह्युजेस रोड, एलबीएस रोड, साकीविहार रोड मार्ग.

06:16 PM

अनंत चतुर्दशीला तिन्ही मार्गांवर विशेष लोकल

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी २८ सप्टेंबरला मध्यरात्री रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर १० विशेष लोकल धावणार आहे. त्यामुळे विसर्जनानंतर रात्रीपर्यंत गणेशभक्तांना इच्छीतस्थळ गाठता येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे.

06:13 PM

अनंत चतुर्दशी निमित्त रस्ते वाहतुकीत बदल

कोणते रस्ते बंद असतील?
नाथालाल पारेख मार्ग, जे एस एस रोड, विठ्ठलभाई पटेल बाबासाहेब जयकर मार्ग, कावसजी पटेल मार्ग, टँक रोड, नानूभाई देसाई रोड, पीडी मेलो रोड, दादासाहेब भडमकर मार्ग,  सँडहर्स्ट रोडचा मार्ग,  एन. ए. पुरंदरे मार्ग ते ह्युजेस रोड, एलबीएस रोड, साकीविहार रोड मार्ग.

06:13 PM

​​​​​​​१० हजार कर्मचारी; ७१ नियंत्रण कक्ष अन् ४६ जर्मन तराफे!

विसर्जनाच्या सुविधेसाठी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १९८ कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. तसंच विसर्जनासाठी ४६ जर्मन तराफे, ७६४ जीवरक्षक आणि ४८ मोटरबोटी तैनात करण्यात आल्या आहेत. 

Web Title: anant chaturdashi ganesh utsav ganpati visarjan 2023 lalbaugcha raja ganesh galli chinchpoklicha chintamani mumbai live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.