Join us

शोकाकुल वातावरणात अनितातार्इंना दासभक्तांचा निरोप

By admin | Published: April 15, 2015 10:47 PM

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निरुपणातून सामाजिक परिवर्तनाच्या अलौकिक विचारातून अनितातार्इंची वैचारिक बैठक निश्चित झाली.

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निरुपणातून सामाजिक परिवर्तनाच्या अलौकिक विचारातून अनितातार्इंची वैचारिक बैठक निश्चित झाली. तर सासूबाई शारदामाता यांच्याकडून त्यांनी कौटुंबिक समन्वयाचे धडे घेतले. नानासाहेब निरुपण व अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात दौऱ्यांवर असताना त्यांच्या समवेत आप्पासाहेब देखील असायचे. त्यावेळी संपूर्ण कुटुंबाच्या समन्वयाची दीक्षा सासूबाई शारदामाता यांच्याकडून अनितातार्इंनी घेतली.समाजातील प्रत्येकाच्या मनात सुसंस्कारांची बीजे पेरुन, शिस्तबद्ध एकसंध आणि सक्षम समाज निर्मितीतून ‘हे विश्वची माझे कुटुंब’ ही वैश्विक संकल्पना ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवली आणि त्याच वेळी अनितातार्इंनी आपले पती ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब, चिरंजीव उमेशदादा, सचिनदादा, राहुलदादा, कन्या प्रीतीताई, सुना, जावई, नातवंडे अशा या धर्माधिकारी कुटुंबांच्या प्रभावी कुटुंब समन्वयक म्हणून बजावलेली भूमिका तितकीच महत्त्वाची होती.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणारे आरोग्य शिबिर व स्वच्छता मोहिमा यामध्ये त्यांना मोठी रुची होती. काही कार्यक्रमांमध्ये त्या प्रत्यक्ष सहभागी देखील झाल्या होत्या. आरोग्य व स्वच्छता या दोन्ही विचारांच्या त्या पुरस्कर्त्या होत्या आणि त्यातूनच त्या त्यांच्या सहवासातील महिलांमध्ये या विचारांची बीजे पेरण्याचे काम सातत्याने करीत असत. आपल्या प्रत्यक्ष कृतीतून अनेकांना सुसंस्कारित करण्यात यश मिळविले होते.