Join us

अँकर अर्पिता तिवारी हत्या प्रकरण : मित्र अमित हाजरा याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 4:35 PM

अँकर अर्पिता तिवारी (२४) हिच्या मृत्यूप्रकरणी तिचा मित्र अमित हाजरा याला मालवणी पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच्या काही मनसोपचार चाचण्या पोलिसांनी केल्या होत्या. ज्यात हे उघड झाले.

मुंबई - अँकर अर्पिता तिवारी (२४) हिच्या मृत्यूप्रकरणी तिचा मित्र अमित हाजरा याला मालवणी पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच्या काही मनसोपचार चाचण्या पोलिसांनी केल्या होत्या. ज्यात हे उघड झाले. हाजरा याने तिची हत्या का केली याची चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले. त्याला २० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याचे फटांगरे यांनी नमुद केले.  

गेल्या महिन्यात ११ डिसेंबर रोजी मालवणीतील मानवकल्याण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या डकट फ्लोअरवर तिवरीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत रक्तबंबाळ स्थितीत सापडला होता. याच इमारतीत ती पंधराव्या मजल्यावर तिचा मित्र पंकज जाधव यांच्यासोबत गेली पाच वर्षे पेईंग गेस्ट म्हणुन राहत होती. सुरवातीला पोलिसानी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र घरच्यांच्या तक्रारीनुसार नंतर याप्रकरणी हत्येच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

अर्पिता तिवारीने दोन वर्षापूर्वी इव्हेंट व अॅडव्हरटाईसिंग कंपनी सुरू केली होती. मास मीडियामधून पदवी घेतल्यानंतर अर्पिताने एमबीएचं शिक्षण घेतलं होतं. तसंच 2012 पासून ती इव्हेंटमध्ये अँकरिंगही करत होती. अर्पिता तिच्या प्रियकराबरोबर गेल्या पाच वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होती तसंच ते दोघे लवकरच लग्न करण्याच्या विचारात होते. अर्पिताच्या कुटुंबीयांना त्यांच्या लग्नाबद्दल काहीही आक्षेप नसल्याचं पोलिसांनी सांगितले होते. 

ही घटना घडली त्या रात्री रात्री तीन वाजेच्या सुमारास अर्पिता व तिचा प्रियकर मित्राच्या घरी झाले होते. अर्पिता, तिचा प्रियकर व त्यांचे इतर चार मित्र अशा सगळ्यांनी रात्री पार्टी करून ते चार वाजेच्या सुमारात झोपायला गेले. यापैकी एक जण सकाळी 7 वाजता उठल्यावर त्याला  अर्पिता तेथे दिसली नाही. त्यावेळी त्याला बाथरूमचा दरवाजा बंद असलेला दिसला. अर्पिता बाथरूमध्ये असावी, असा विचार तिच्या मित्राने केला. अर्ध्या तासाने त्याला पुन्हा जाग आल्यावर त्याला अर्पिता तेथे दिसली नाही. अर्पिताच्या मित्राने नंतर तिच्या प्रियकराला उठवले व त्या दोघांनी बाथरूमचा दरवाजा वाजवला. पण बाथरूममधून काहीही उत्तर न आल्याने त्याने डुप्लिकेट चावीने बाथरूमचा दरवाजा उघडला.बाथरूम रिकामे होते आणि खिडकीवरील चाका जागेवर नव्हत्या.  अर्पिता खिडकीतून बाहेर पडली असा अंदाज व्यक्त करत अर्पिताच्या प्रियकराने व त्यांच्या मित्राने इमारतीखाली धाव घेतली. अर्पिताचा मृतदेह त्यांना दुसऱ्या मजल्यावर आढळून आला होता. 

टॅग्स :गुन्हामुंबई