मालाडमध्ये अँकर तरूणीचा इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 11:17 AM2017-12-12T11:17:43+5:302017-12-12T11:18:45+5:30

मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात एका अँकर तरूणीचा इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

Anchor boy dies in Malad from the 15th floor of the building and dies | मालाडमध्ये अँकर तरूणीचा इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

मालाडमध्ये अँकर तरूणीचा इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Next
ठळक मुद्दे मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात एका अँकर तरूणीचा इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. अर्पिता तिवारी असं तरूणीचं नाव असून ती इव्हेंट शोमध्ये अँकरिंग करत होती.

मुंबई- मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात एका अँकर तरूणीचा इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. अर्पिता तिवारी असं तरूणीचं नाव असून ती इव्हेंट शोमध्ये अँकरिंग करत होती. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चोवीस वर्षिय अर्पिता तिवारीने दोन वर्षांपूर्वी स्वतः व्यवसाय सुरू केला होता. अर्पिता 15 व्या मजल्यावरून पडली कि तिने उडी घेतली, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

अर्पिता तिवारी व तिचा प्रियकर महाकाली रोडवर असणाऱ्या मानवस्थळ अपार्टमेंटमध्ये त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते. मानवस्थळ ही 19 मजल्यांची इमारत आहे. अर्पिता व तिच्या प्रियकराचा मित्र 15 व्या मजल्यावर राहत होता. अर्पिता तिवारीने उडी घेतली की ती पडली याबद्दलची स्पष्टता नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अर्पिताच्या प्रियकराची व मित्राची चौकशी केली जाते आहे. 

अर्पिता तिवारीने दोन वर्षापूर्वी इव्हेंट व अॅडव्हरटाईसिंग कंपनी सुरू केली होती. मास मीडियामधून पदवी घेतल्यानंतर अर्पिताने एमबीएचं शिक्षण घेतलं होतं. तसंच 2012 पासून ती इव्हेंटमध्ये अँकरिंगही करत होती. अर्पिता तिच्या प्रियकराबरोबर गेल्या पाच वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होती तसंच ते दोघे लवकरच लग्न करण्याच्या विचारात होते. अर्पिताच्या कुटुंबीयांना त्यांच्या लग्नाबद्दल काहीही आक्षेप नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

सोमवरी रात्री तीन वाजेच्या सुमारास अर्पिता व तिचा प्रियकर मित्राच्या घरी झाले होते. अर्पिता, तिचा प्रियकर व त्यांचे इतर चार मित्र अशा सगळ्यांनी रात्री पार्टी करून ते चार वाजेच्या सुमारात झोपायला गेले. यापैकी एक जण सकाळी 7 वाजता उठल्यावर त्याला  अर्पिता तेथे दिसली नाही. त्यावेळी त्याला बाथरूमचा दरवाजा बंद असलेला दिसला. अर्पिता बाथरूमध्ये असावी, असा विचार तिच्या मित्राने केला. अर्ध्या तासाने त्याला पुन्हा जाग आल्यावर त्याला अर्पिता तेथे दिसली नाही. अर्पिताच्या मित्राने नंतर तिच्या प्रियकराला उठवलं व त्या दोघांनी बाथरूमचा दरवाजा वाजवला. पण बाथरूममधून काहीही उत्तर न आल्याने त्याने डुप्लिकेट चावीने बाथरूमचा दरवाजा उघडला.बाथरूम रिकामं होतं आणि खिडकीवरील चाका जागेवर नव्हत्या.  
अर्पिता खिडकीतून बाहेर पडली असा अंदाज व्यक्त करत अर्पिताच्या प्रियकराने व त्यांच्या मित्राने इमारतीखाली धाव घेतली. अर्पिताचा मृतदेह त्यांना दुसऱ्या मजल्यावर आढळून आला. सकाळी साडेनऊ वाजता ही मुलं काय शोधत आहेत. याचा विचार आम्ही करत होतो, असं सोसायटीच्या मॅनेजरने म्हटलं आहे. मुलांना अर्पिताचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावर आढळला. त्यानंतर त्यांनी तात्काळ आम्हाला माहिती दिली. मुलांच्या माहितीवरून आम्ही पोलिसांना कळवलं, असंही मॅनेजरने सांगितलं आहे. दरम्यान, पोलीस तपास सुरू झाला असून सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचा आढावा पोलिसांकडून घेतला जातो आहे. 

अर्पिता व तिच्या प्रियकरामधील परिस्थिती व्यवस्थित होती की नाही ? याचाही तपास पोलीस करत आहेत. अर्पिताने कुठलीही चिठ्ठी ठेवली नाही. त्यामुळे तिचा मोबाइल व सोशल मीडिया अकाऊंट तपासले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मालवणी पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली असून शिवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.
 

Web Title: Anchor boy dies in Malad from the 15th floor of the building and dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.