...आणि यांच्यापुढे हरला कर्करोग, जागतिक कर्करोग दिन विशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:12 AM2019-02-04T07:12:20+5:302019-02-04T07:12:33+5:30

कर्करोग म्हटला की जीवनाचा अंत होणारच, असा काहीसा विचार सामान्यांच्या मनात रुजला आहे. त्यामुळे कर्करोगाचे निदान झाले की आपण जगण्याची आशा नाही, असा समज रुग्ण करून घेतात.

 ... and to be defeated against cancer, World Cancer Day Special | ...आणि यांच्यापुढे हरला कर्करोग, जागतिक कर्करोग दिन विशेष

...आणि यांच्यापुढे हरला कर्करोग, जागतिक कर्करोग दिन विशेष

googlenewsNext

मुंबई  - कर्करोग म्हटला की जीवनाचा अंत होणारच, असा काहीसा विचार सामान्यांच्या मनात रुजला आहे. त्यामुळे कर्करोगाचे निदान झाले की आपण जगण्याची आशा नाही, असा समज रुग्ण करून घेतात. पण या भीतीवर मात करून लहानग्या वयात ज्यांच्यासमोर कर्करोग हरला, अशी काही सर्व्हायव्हर्स आता अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. बालपणात कर्करोगाचे निदान झाल्यानंतर शारीरिक-मानसिक स्थितीशी संघर्ष करीत कर्करोगाला हरविलेल्या रुग्णांनी मिळून ‘उगम’ हे व्यासपीठ निर्माण केले आहे. कर्करोगावर मात करून अन्य कर्करुग्णांना समुपदेशन देण्याचे काम ही मंडळी आता ‘उगम’च्या माध्यमातून करीत आहेत.

डोळ्याचा कर्करोग झालेली ३० वर्षांची प्रीती फड ही गेली अनेक वर्षे टाटा रुग्णालयात येणाऱ्या लहानग्या कर्करुग्णांचे, त्यांच्या पालकांचे समुपदेशन करीत आहे. मानसिक चढ उतार, निराशा, उपचारांचा लांबत चाललेला कालावधी, रेडिएशन, केमोथेरपी अशा अनेक आव्हानांना सामोरे जाताना मनातून खचूनही जगण्याची जिद्द न सोडल्यामुळे प्रीतीने कर्करोगाला हरविले आहे. आपल्यासारख्या अन्य रुग्णांनाही मदत करता यावी, त्यांना धीर देऊन पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभे राहण्याचे बळ मिळावे म्हणून प्रीती ‘उगम’च्या माध्यमातून काम करतेय. याविषयी प्रीती सांगते की, सुरुवातीला टाटा रुग्णालय म्हटले की वेगळ्या प्रकारची धास्ती मनात होती. पण आता मात्र हे रुग्णालय म्हणजे माझे दुसरे घर झाले आहे. या रुग्णालयाने माझा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला, असे प्रीती आवर्जून सांगते.

रुग्णांना दिला जातो सकारात्मक दृष्टिकोन

इंडियन कॅन्सर सोसायटीच्या कॅन्सर सर्व्हायव्हरशिप शाखेत काम करणाºया डॉ. वंदना धामणकर यांनी सांगितले की, कर्करोगाचे निदान झाले की बºयाचदा रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय नैराश्यावस्थेत जातात. याचा परिणाम उपचारावरही होतो, त्यामुळे ‘उगम’च्या माध्यमातून लहान वयात कर्करोग झालेल्या रुग्णांना सकारात्मक दृष्टिकोन दिला जातो. उपचारादरम्यान होणारे मानसिक खच्चीकरण दूर करण्यास रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांचेही समुपदेशन केले जाते.
 

Web Title:  ... and to be defeated against cancer, World Cancer Day Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.