...आणि देशात परतायचा निर्णय घेतला
By admin | Published: May 21, 2015 02:04 AM2015-05-21T02:04:15+5:302015-05-21T02:04:15+5:30
असह्य वेदनेसह जखम दिवसेंदिवस चिघळत असल्याने जीव नकोसा झाला होता. कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. भारतीय असल्यामुळे तर सेवा-सुश्रुषेतही मुद्दामहून दुजाभाव केला जायचा.
डिप्पी वंकाणी ल्ल मुंबई
असह्य वेदनेसह जखम दिवसेंदिवस चिघळत असल्याने जीव नकोसा झाला होता. कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. भारतीय असल्यामुळे तर सेवा-सुश्रुषेतही मुद्दामहून दुजाभाव केला जायचा. महिलांचा छळवाद पाहिल्यानंतर तर काहीही झाले तरी भारतात परतायचेच असा ठाम निर्णय घेतला, अशी माहिती देत अरीब माजिदने इराकमधील कटू अनुभवांचा पाढा दहशतवादविरोधी पथकासमक्ष (एटीएस) वाचला.
इसिसकडून (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅॅण्ड सीरिया) लढताना अरीब गंभीर जखमी झाला. त्याला मदत छावणीत हलविण्यात
आले. उपचार करणे तर सोडाच, भारतीय असल्याने कोणीही ढुंकूनही पाहत नसत. इसिस दहशतवादी महिलांचा अनन्वित छळ करायचे. गुलाम म्हणून त्यांच्या लैंगिक अत्याचार करीत. हा सर्व प्रकार पाहून माझे डोळे उघडले, असे माजिदने चौकशीत सांगितले, अशी माहिती एटीएसच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
इसिसमध्ये सामील होण्यासाठी गेलेल्या कल्याणच्या चार युवकांच्या प्रवासासाठी दौलतीने दीड लाख रुपये दिले होते. कल्याणमधील आदील दोलारीस आणि दौलती हे दोघे व्यावसायिक भागीदार आहेत. आम्हांला आॅनलाईनच उपदेश करण्यात आला. मोसूलला पोहोचल्यानंतर एकाने (हब्बू फातिमा) मशिदीतून बाहेर येण्यास फर्मावले. तेथून नंतर एक इसमासोबत इसिसच्या कॅम्पवर नेण्यात आले. तेथे शस्त्रास्त्रांचे १५ दिवस ट्रेनिंग देण्यात आले.
माजिद स्थापत्य अभियंता असल्याने त्याला बांधकामावर ठेवण्यात आले. तथापि, त्यानेही लढ्यात उतरण्याची इच्छा व्यक्त केल्याने इसिसने त्याला सोबत घेतले. मोसूल धरण कब्जात घेण्यासाठी इसिसच्या बाजुने लढताना तो गोळीबारात जबर जखमी झाला. सोबतच्या लोकांनी इस्पितळात दाखल केले; परंतु, तेथे कोणीही लक्ष दिले नाही, असे माजिदने चौकशीत सांगितले. तुर्कीहून विमानाने भारतात पोहोचताच त्याला अटक करण्यात आली.