...अन् ‘लसवंत’ कर्मचाऱ्यांसह विमानाचे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:05 AM2021-06-17T04:05:42+5:302021-06-17T04:05:42+5:30

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले विमान बुधवारी आकाशात झेपावले. दोन्ही डोस घेतलेल्या केबीन क्रूसह ...

... and the flight with the ‘Laswant’ crew | ...अन् ‘लसवंत’ कर्मचाऱ्यांसह विमानाचे उड्डाण

...अन् ‘लसवंत’ कर्मचाऱ्यांसह विमानाचे उड्डाण

Next

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले विमान बुधवारी आकाशात झेपावले. दोन्ही डोस घेतलेल्या केबीन क्रूसह उड्डाण करणारे हे देशातील पहिले विमान ठरले. दिल्ली - मुंबई - दिल्ली मार्गावर या विमानाने सेवा दिली.

कोविड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने काही फ्रंटलाईन वर्कर्ससह विमान कर्मचाऱ्यांचाही लसीकरण कालावधी लांबला आहे. बहुतांश विमान कर्मचाऱ्यांचे लसीकरण जुलैअखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, लसीकरण वेळेत पूर्ण करीत केवळ ‘लसवंत’ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले त्यांचे यु. के. ९६३ हे विमान बुधवारी दिल्लीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सध्या लसीकरण पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची फळी मैदानात उतरविली आहे.

.....................................................

Web Title: ... and the flight with the ‘Laswant’ crew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.