...आणि चिमुरडीने आईला केले शौचालयात लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 07:02 AM2019-11-28T07:02:32+5:302019-11-28T07:02:46+5:30
गॅसवर दूध गरम होण्यासाठी ठेवून आई शौचालयात गेली. त्याच दरम्यान खेळता खेळता अडीच वर्षाच्या चिमुरडीने दरवाजा बाहेरुन लॉक केला.
मुंबई : गॅसवर दूध गरम होण्यासाठी ठेवून आई शौचालयात गेली. त्याच दरम्यान खेळता खेळता अडीच वर्षाच्या चिमुरडीने दरवाजा बाहेरुन लॉक केला. आईने दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. मात्र मुलीला काहीही समजत नसल्याने गोंधळ वाढला. त्यात, गसवरील दूध करपून धुर झाल्याने आईला शौचालयात श्वास गुदमरण्यास सुरुवात झाली. अखेर शेजारच्याचे धुराकडे लक्ष जाताच त्यांनी पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर महिलेची सुटका झाल्याची घटना बुधवारी धारावीत घडली.
धारावीतील शाहू नगरच्या मित्रा संघम सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाºया गायकवाड कुटुंबियांच्या घरात ही घटना घडली. हीना गायकवाड या पती रुषीकेश आणि अडीच वर्षाची मुलगी परीसोबत राहते. बुधवारी सायंकाळी साडे पाच सुमारास हिना यांनी चहा बनविण्यासाठी गसवर दूध गरम होण्यासाठी ठेवले. आणि त्या शौचालयात गेल्या. त्यांच्या मागे गेलेल्या परिने चुकून शौचालयाला बाहेरुन लॉक केले. दरवाजा उघडायचा कसा याबाबत ती अनभिज्ञ होती.
हिना यांनी ओरडून देखील परिला दरवाजा उघडण्याबाबत समजत नव्हते. त्यात, दूध करपल्याने घरात धूर झाला. महिलेÞचा ‘वाचवा वाचवा’चा आवाज त्यात, घराबाहेर येत असल्याने धुराने शेजारच्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. मात्र मुख्य दरवाजाही बंद होता. आणि अखेर त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. घटनेची वर्दी लागताच शाहू नगर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी, साडे सहाच्या सुमारास महिलेला सुखरुप बाहेर काढले. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.