मुंबई : दिल्लीहून पुण्याला जाणारे गो एअरचे फ्लाइट जी 8 173 हे विमान पुण्याच्या हवाई हद्दीत सुरू असलेल्या एअर फोर्सच्या हालचालींंमुळे होणारा संभाव्य विलंब लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विमानतळावर वळवण्यात आले. पुण्याच्या हवाई हद्दीत जास्त वेळ चकरा मारण्यात विलंब होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विमानातील इंधन समाप्त होण्यापूर्वी इंधन भरण्यासाठी विमान मुंबई विमानतळावर उतरवण्याची परवानगी हवाई नियंत्रण कक्षाकडे मागण्यात आली. एकूण परिस्थिती पाहून मुंबई हवाई नियंत्रण कक्षाने विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरवण्यास परवानगी दिली. इंधन भरल्यानंतर विमानाने साडेबारा वाजता पुण्याला जाण्यासाठी उड्डाण केल्याची माहिती गो एअरच्या प्रवक्त्याने दिली.
...आणि गो एअरचे विमान मुंबईकडे वळवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 4:47 PM