Join us

...आणि पृथ्वीवर चंद्र अवतरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 1:21 AM

इस्रो पथकांच्या चांद्रयान मोहिमांना अभिवादनासाठी मून इन्स्टॉलेशन

मुंबई : नेहरू तारांगणाच्या वास्तूला भेट देणाऱ्यांना पृथ्वीवर अवतरलेल्या चंद्राचे रूप न्याहाळता येणार आहे. साइडवेजसह एशियन पेंटच्या संकल्पनेतून उतरलेल्या चंद्राचा घुमट स्टार्ट फाउंडेशनच्या कलाकारांनी साकारला आहे. येत्या काही महिन्यांपर्यंत तो रसिक प्रेक्षकांसाठी पाहण्यासाठी खुला असणार आहे.देशात तयार करण्यात आलेले हे चंद्राचे आजवरचे सगळ्यात मोठे इन्स्टॉलेशन आहे. पृथ्वीवर उतरलेला हा चंद्र कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहता यावा आणि हा दृश्यानुभव अविस्मरणीय बनावा यासाठी नेहरू सेंटरमध्ये एक दर्शक गॅलरीसुद्धा तयार करण्यात आली आहे.गॅलरीमध्ये प्रवेश विनामूल्य असणार आहे. हे इन्स्टॉलेशन सकाळी आठवड्याचे सर्व दिवस, ११ वाजल्यापासून ते रात्री ९:३० वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले असणार आहे. हा चंद्र घुमट म्हणजे भारताच्या चांद्रयान मोहिमांना केलेले अभिवादन तसेच इस्रोच्या वैज्ञानिकांना दिलेली मानवंदनाही असेल. चंद्राची सर्व वैशिष्ट्ये, त्याच्या संपूर्ण वैभवानिशी या कलाकृतीमध्ये साकारण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला आहे. त्यामुळे न दिसणाºया चंद्राच्या दक्षिण गोलार्धाची झलकही यात दिसणार आहे.ही कलाकृती पाहताना मला आनंद होत आहे. कधीही नाउमेद न होणाºया इस्रोप्रमाणेच युवा कलाकारांनीही मेहनत करून इस्रोला अभिवादन करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. - अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण