Join us

.. अन् त्याच्या सैन्य भरतीचा मार्ग मोकळा झाला; फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:45 PM

देवेंद्र फडणवीस यांनी शुभमच्या पोस्टला ट्विटवरुन रिप्लाय देत मी देव नाही, पण माझं कर्तव्य करत असतो असे म्हटलंय.

मुंबई - पोलीस भरती किंवा सैन्य भरतीसाठी राज्यातील तरुणाई मोठं कष्ट घेते. भरतीच्या तयारीसाठी दिवसरात्र अभ्यास आणि शारिरीक चाचणीसाठी मैदानावर सराव करत असते. लेखी आणि शारिरीक चाचणी या दोन्ही परीक्षेत यश मिळाल्यानंतर संबंधित उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन प्रक्रिया असते. मात्र, काहीवेळा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करताना विविध अडचणींचा सामना करावा लागता. शुभम बोते नावाच्या एका तरुणालाही असाच सामना करावा लागला. मात्र, आता सगळं संपलं वाटत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्या मदतीला धावले अन् त्याचा सैन्य भरतीचा मार्ग मोकळा झाला. याबाबत, स्वत: शुभम बोते याने ट्विटरवरुन पोस्ट लिहिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शुभमच्या पोस्टला ट्विटवरुन रिप्लाय देत मी देव नाही, पण माझं कर्तव्य करत असतो असे म्हटलंय. शुभमने ट्विटरवरुन थ्रेड ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपला सैन्य भरतीचा मार्ग मोकळा झाल्याची गोष्टच लिहिली आहे. माझ्या तोंडुन सुटलेला घास अलगद माझ्या मुखात घालण्याच काम या  देव माणसानं केल, अशा शब्दात शुभम बोते यांनी देवेंद्र फडणवीस हे देवमाणूस असल्याचं म्हटलंय. शुभमच्या या ट्विटला देवेंद्र फडणवीस यांनी रिप्लाय देत,  प्रिय शुभम,उत्साहाच्या भरात खूप काही लिहिलेस... ना मी देव, ना अन्नदाता!केवळ प्रयत्न करीत असतो, जमेल तितक्या लोकांच्या कामी येण्याचा !राष्ट्रसेवेची तुझी जिद्द निश्चितच अभिमानास्पद आहे... देशसेवेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!जयहिंद !  असे म्हणत शुभमला देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

शुभम बोतेची ट्विटरवरील पोस्ट

साहेब, तुमच्या नावातच देव आहे तुम्ही खरोखर देव आहे. मित्रांनो मी नुकताच आर्मी भरती झालोय परंतु पोलिस व्हेरीपीकेशन मधे काही अडथळे आले ते सुटतां सुटत नव्हते. हातातोंडाळी आलेली नोकरी गेली यांच अपेक्षेने घरी बसलो. माझा जिव कासावीस झाला आई वडीलांच्या कुशीत डोके ठेऊन  मोठमोठयाने रडत होतो. आर्मी मधे जाऊन देश सेवा करण्याच माझ स्वप्न भंगल गेल होतं. डोळ्यापुढे संपुर्ण आंधार होता. फेसबुक सोशल मीडिया स्क्रोल करत असताना देवेंद्रजी फडणवीस यांच्या फेसबुक अपडेट पुढे आली. माझ्यासोबत झालेला प्रकार देवेंद्रजींना सांगुन काय होतय का याची चाचपनी सुरु केली. देवेंद्रजींच्या पोस्टवर रोज लाईक कमेन्ट करणाऱ्या २-३ कार्यकर्त्यांना फेसबुक मेसेज केले. गणेश कराड  यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी देवेंद्रजींचा व त्यांचे पी.ए. मनोज मुंडे यांचा पर्सनल नंबर शेअर केला. आज २० मार्च दुपारी २ वा.डॅक्युमेंट जमा करण्याची शेवटची वेळ होती.

सकाळी फोन वाजला समोरुन आवाज होता, मी देवेंद्र फडणवीस बोलतोय हे एका चमत्काराच्याही पलिकडे होतं. स्वत:, साहेब बोलले पुढे सर्व यंत्रणा कामाला लागल्या अन् माझ्या तोंडुन सुटलेला घास अलगद माझ्या मुखात घालण्याच काम या  देव माणसानं केल. hank You अन्नदाता 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभारतीय जवानट्विटर