मुंबई-झोपडपट्टीवासीयांना न्याय देण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ साली जारी केलेल्या एसआरए कायद्याची महाआघाडी सरकारने लवकर अंमलबजावणी करावी या मागणीसाठी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी हे रस्त्यावर उतरले आहेत. रविवारी त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. बोरीवली पश्चिम, शिंपोली, कस्तूर पार्क येथील शिव साई गणेश एसआरए इमारतीतील रहिवाश्यांना न्याय मिळण्यासाठी आज ते आंदोलनाला बसले होते.
त्यांच्या आंदोलनाला यश मिळून येथील एसआरए इमारतीतील ११ कुटुंबांना अखेर घर मिळाले असून आहे. सदनिकेच्या चाव्या त्यांच्या हस्ते सुपुर्द देखील करण्यात आल्या.
ऐन गणपतीत आपल्याला घरांच्या चाव्या मिळाल्याबद्दल या रहिवाश्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला.
२००० पूर्वीपासून येथील नागरिक पात्र असताना बिल्डर घर देत नव्हता आणि त्यांना भाडे पण देत नव्हता. आपल्या आंदोलनाची दखल अजून सरकारने घेतली नाही. एसआरएच्या बिल्डरांनी घेतली आहे. या आंदोलना दरम्यान गेली अनेक वर्षे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना घरे देण्यासाठी बिल्डर पुढे येतील अशा विश्वास खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.