Join us

अन् नस कापलेल्या तरुणाला मिळाले जीवनदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 2:25 AM

‘मेरा बेटा मर जायेगा, वो सुसाईड करने वाला है, घर पर कोई नही है, हम सब अलाहाबाद मे है, साहब मेरे बेटे को बचा लो..

गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : ‘मेरा बेटा मर जायेगा, वो सुसाईड करने वाला है, घर पर कोई नही है, हम सब अलाहाबाद मे है, साहब मेरे बेटे को बचा लो...’ रात्री ३च्या सुमारास घाबरलेल्या पूजा नावाच्या एका महिलेचा फोन वनराई पोलीस ठाण्यात आला. रात्रपाळीसाठी नियुक्त असलेल्या पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत पाटील यांनी तो उचलला. महिलेचे म्हणणे ऐकल्यावर त्यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना रासम यांना कळविले. त्यानंतर रासम आणि पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई पोलिसांचे एक पथक तडक महिलेने दिलेल्या गोरेगाव पूर्वेच्या वनराई कॉलनी या पत्त्यावर दाखल झाले. दरवाजा ठोठावला. कोणीही प्रतिसाद देत नसल्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला.नस कापल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण त्यांच्या नजरेस पडला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार केल्यामुळे त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. पोलीस ठाण्यात त्या तरुणाच्या आईचा फोन सतत वाजत होता. ‘आपका बेटा अब ठीक है,’ असे उत्तर वनराई पोलिसांनी त्या महिलेला दिले आणि त्या माउलीने ‘आप भगवान हो, मेरे बच्चे को बचा लिया,’ असे सांगत ढसाढसा रडत पोलिसांचे आभार मानले. आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण हा एक नवकलाकार आणि मॉडेल होता. त्याने स्वत:च्या हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.वनराई पोलिसांच्या हद्दीमध्ये ‘एनएससी’ हे मोठे एक्झिबिशन सेंटर आहे. त्या ठिकाणी अनेकदा हिरे आणि दागिन्यांचे प्रदर्शन भरविले जाते. तसेच या ठिकाणी आयटी सेक्टर आहे. त्यात जगभरातील विदेशी पाहुण्यांचे येणे-जाणे असते. त्यामुळे त्या ठिकाची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवणे ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. तसेच या ठिकाणी मुस्लीम आणि दलित लोकवस्ती आहे. त्यामुळे कोणतीही संवेदनशील घटना घडली की त्या परिसरातील बंदोबस्त चोख ठेवणे वनराई पोलिसांसाठी आव्हान असते.गाजलेली प्रकरणेचियांग चांग क्विंग आणि डेंग झियाबो या दोघा हिरे चोरांना अटक करण्यात आली होती. २७ ते ३१ जुलै २०१७ दरम्यान गोरेगावमध्ये भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय हिरे प्रदर्शनात त्यांनी डल्ला मारला होता.रंगपंचमीचा फायदा घेत नीलेश गावसकर (३२) याची हत्या करण्यात आली. सुनील पाटील याने पोटात चाकू घुसवून गावसकरला ठार केले. हे प्रकरण अवघ्या आठ तासांत पोलिसांनी उघड करत आरोपीला गजाआड केले.कुटुंबासारखे पोलीस ठाण्याचे नियोजनमहिला असूनही मी पोलीस ठाणे सांभाळत आहे, ज्याचे श्रेय आमचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाते. त्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे मला नेहमी प्रोत्साहन मिळते. माझा स्टाफदेखील मला योग्य सहकार्य करतो. त्यामुळे एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्यांच्या मदतीने आठ तासांच्या नियोजनाबरोबर तीन लाखांची लोकसंख्या असलेले वनराई पोलीस ठाणे मी सांभाळू शकते.- ज्योत्स्ना रासम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वनराई पोलीस ठाणेवनराई पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला एक ओपन जीम बांधण्यात आली आहे. तसेच वाचनालयदेखील तयार करून त्यात दोन संगणक बसविण्यात आले आहेत. ज्याचा फायदा वनराई कॉलनी आणि पोलीस वसाहतीमधील पोलिसांना होत आहे.परिमंडळ : १२लोकसंख्या : ३.२ लाखपोलीस उपायुक्त : डॉ. विनयकुमार राठोडबीट चौकी : २आरे रोड आणि बिंबिसार नगरतक्रारीसाठी संपर्कवरिष्ठ पोलीस निरीक्षकज्योत्स्ना रासम२६८६१६७७/२९३३