अन् स्मृतिभ्रंश झालेली वृद्ध महिला पोहचली घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:31 AM2018-03-14T02:31:46+5:302018-03-14T02:31:46+5:30

रस्ता विसरलेल्या स्मृतिभ्रंशग्रस्त वृद्ध महिलेला सुखरूप घरी पोहचवण्याची कामगिरी मुंबई पोलिसांनी मंगळवारी करून दाखवली आहे. पतिसा संपतराज कोठारी या ८७ वर्षीय वृद्धेला एल.टी.मार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या २४ तासांच्या आत पुन्हा घरी परतता आले.

And the women of dementia reached the home | अन् स्मृतिभ्रंश झालेली वृद्ध महिला पोहचली घरी

अन् स्मृतिभ्रंश झालेली वृद्ध महिला पोहचली घरी

Next

मुंबई : रस्ता विसरलेल्या स्मृतिभ्रंशग्रस्त वृद्ध महिलेला सुखरूप घरी पोहचवण्याची कामगिरी मुंबई पोलिसांनी मंगळवारी करून दाखवली आहे. पतिसा संपतराज कोठारी या ८७ वर्षीय वृद्धेला एल.टी.मार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या २४ तासांच्या आत पुन्हा घरी परतता आले.
याआधी चिराबाजार परिसरात एक वृद्ध महिला संशयास्पदरित्या फिरत असताना गस्तीवरच्या पोलिसांना आढळली. तिच्याशी संवाद साधला असता संबंधित महिलेची स्मृतिभ्रंश असल्याचे समजले. आपण एका मंदिराजवळ राहत असल्याचे ती महिला वारंवार सांगत होती. एवढ्याशा माहितीवरून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली.
सोशल मीडिया आणि आपल्या सूत्रांना कामाला लावत अवघ्या काही तासांतच पोलिसांनी महिलेचा पत्ता शोधून काढला. तसेच फणसवाडी येथील त्यांच्या राहत्या घरी मुलाच्या ताब्यात वृद्ध महिलेचा ताबा देण्यात आला.

Web Title: And the women of dementia reached the home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.