Join us

धक्कादायक! अंधेरीत 15 जणांनी अल्पवयीन मुलावर केला लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 12:06 PM

अंधेरीत १५ जणांनी मिळून एक  अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई, दि. 2 - अंधेरीत १५ जणांनी मिळून एक  अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घर दाखविण्याच्या बहाण्याने  मित्राने घरी नेत अनैसर्गिक अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास बदनामीसह जीवेमारण्याची धमकी दिली. आरोपीने त्याच्या अन्य मित्रांना याबाबत सांगितले. त्यांनीही पीडित मुलावर अत्याचार सुरु केले. अशाच प्रकारे गेले वर्षभर १६ वर्षाच्या मुलावर १५ जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री अंधेरीत उघडकीस आली. याप्रकरणी डी. एन नगर पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून पसार 8 जणांचा शोध सुरु आहे.अंधेरी परिसरात 16 वर्षाचा सोनू (नावात बदल) कुटुंबीयासोबत राहतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एका मित्राने घर दाखविण्यासाठी घरी नेले. घरात कुणीही नसल्याची संधी साधत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. याबाबत कुणाला सांगितले तर बदनामी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. सोनूने भितीने कुणालाच सांगितले नाही. त्याचा याच भितीचा फायदा घेत आरोपी मित्राने त्याच्यावर अत्याचार सुरुच ठेवले. त्यानंतर याची माहीती त्याच्या अन्य मित्रांना दिली. त्याला धमकाहून आरोपीसह त्याच्या 15 मित्रांकड़ून सोनूवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार सुरु होते. कधी खेळाच्या मैदानावर, तर कधी आरोपींच्या घरी नेऊन त्याच्यावर अत्याचार सुरु होते. सोनुने घराबाहेर निघणेही बंद केले होते. मंगळवारी त्याच परिसरात राहत असलेल्या समाजसेवकाने सोनूकड़े विचारणा केली. तेव्हा सोनूने घडलेल्या प्रकार सांगितला. सोनूसह डी.एन नगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सोनूच्या तक्रारीवरुन पॉक्सो, अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी याप्रकरणात 7 जणाना अटक केली आहे. ते सातही जण अल्पवयीन असल्याची माहीती समोर येत आहे. याप्रकारामुळे सोनूची प्रकृती खालावली आहे.