Join us

Andheri Bridge Collapse : जीव गेल्यानंतर आर्थिक मदतीची घोषणा करणं राजकारण्यांना फार सोपं वाटत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 19:59 IST

रेणुका शहाणेंनी फेसबुकवर केला व्यक्त संताप

मुंबई -  अंधेरीजवळील पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. या दुर्घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. या घटनेबाबत अभिनेत्री रेणुका शहाणे हिने फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून सरकारच्या अकार्यक्षमतेवर सडकून टीका केली आहे. 

एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडली किंवा मोठं नुकसान झाल्यानंतर आर्थिक मदतीची घोषणा करणं आपल्या राजकारण्यांना सोपं वाटतं. कारण हा पैसे करदात्यांचा असल्याने नुकसान झाल्यावर मदत करणं राजकारण्यांना सोपा मार्ग वाटतो अशी खरमरीत टीका रेणुका शहाणे यांनी फेसबुकद्वारे केली आहे. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल कि, राजकारण्यांना किंवा प्रशासनातील ज्या लोकांना जी कामं करण्यासाठी नेमले आहे. ती कामं पूर्ण का होतं नाहीत. याच उत्तर सोपं आहे सरकारने अशी कामं केली, तर त्यांना पैसे खाता येणार नाहीत, तसेच अभ्यासाच्या नावाखाली परदेश दौऱ्यासही फिरायला मिळणार नाही, असे रेणुकाने म्हटले आहे. मुंबईच्या स्पिरिटच्या नावाखाली पुन्हा दुसऱ्या दिवशी मुंबईकर कमला लागतो हे सरकारच्या वागण्याला आणखी एक कारण आहे. नागरिकांनी काळ्या पैश्यावर बोलायची हिम्मत करायची नाही. कारण सरकारने काळा पैसा पांढरा झाला आहे अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता कोणताही भ्रष्टाचार राहिलेला नाही अशी सरकारविरोधात उपहासात्मक फेसबुक पोस्ट रेणुका शहाणे यांनी केली आहे. 

टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटनामुंबईरेणुका शहाणेपश्चिम रेल्वेमान्सून 2018