Andheri Bridge Collapse: दुर्घटनेत जखमी झालेल्या मनोज मेहता यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 10:36 PM2018-07-29T22:36:42+5:302018-07-29T22:37:03+5:30

अंधेरी येथील रेल्वे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या पालघर येथील प्रख्यात विकासक मनोज मेहता (५२) यांची मृत्यूशी सुरू असलेली २७ दिवसांची झुंज रविवारी सायंकाळी संपली.

Andheri Bridge Collapse: Manoj Mehta, who was injured in the accident, died | Andheri Bridge Collapse: दुर्घटनेत जखमी झालेल्या मनोज मेहता यांचा मृत्यू

Andheri Bridge Collapse: दुर्घटनेत जखमी झालेल्या मनोज मेहता यांचा मृत्यू

Next

मुंबई - अंधेरी येथील रेल्वे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या पालघर येथील प्रख्यात विकासक मनोज मेहता (५२) यांची मृत्यूशी सुरू असलेली २७ दिवसांची झुंज रविवारी सायंकाळी संपली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे अंधेरी-डहाणू रोड लोकल पकडण्यासाठी आलेले मनोज मेहता दुर्घटनेत जखमी झाले होते. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. राजेश बिल्डर्स या कंपनीद्वारे त्यांनी पालघर, बोईसरमध्ये गृहसंकुलांची उभारणी केली होती.

Web Title: Andheri Bridge Collapse: Manoj Mehta, who was injured in the accident, died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.