Join us

Andheri Bridge Collapse : सरकारच्या भोंगळ कारभाराचा नमुना-सचिन अहिर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 1:10 PM

अंधेरी येथील पश्चिम रेल्वेच्या पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे मार्गावर कोसळून आज शासनाचा भोंगळ कारभार पुन्हा जनतेपुढे आला आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया मुंबई राष्ट्रवादीचे नेते सचिनभाऊ अहिर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई- अंधेरी येथील पश्चिम रेल्वेच्या पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे मार्गावर कोसळून आज शासनाचा भोंगळ कारभार पुन्हा जनतेपुढे आला आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया मुंबई राष्ट्रवादीचे नेते सचिनभाऊ अहिर यांनी व्यक्त केली आहे. थोड्या उशिराने गर्दीच्या वेळी ही घटना घडली असती तर एलफिन्स्टन पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती.या घटनेत काही प्रवासी जखमी झाले, त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आलं असून, आर्थिक मदत मिळावयास हवी, अशी मागणी सचिन अहिर यांनी केली आहे. खरेतर एलफिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच जुन्या रेल्वे पुलांचे पावसाळ्यापूर्वी ऑडिट व्हावयास हवे होते आणि युद्ध पातळीवर त्यांची डागडुजी व्हायला हवी होती. पण फक्त पोकळ घोषणा करणा-या सरकारच्या कारभाराचा अखेर बोजवारा उडाला आहे. त्याशिवाय चाकरमान्यांचे फार मोठे हाल झाले आहेत, याला जबाबदार कोण? पालिका की सरकार ? असा जळजळीत सवालही सचिनभाऊ अहिर यांनी केला आहे.

टॅग्स :सचिन अहिर