Andheri Bridge Collapse: ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 04:04 AM2018-07-05T04:04:16+5:302018-07-05T04:04:31+5:30

अंधेरी रेल्वेमार्गावरील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील ब्रिटिशकालीन व जुन्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रँट रोड येथील पुलालाही तडे गेल्याने, याचे तीव्र पडसाद स्थायी समितीत बुधवारी उमटले.

Andheri Bridge Collapse: The question of security for the British bridge bridges | Andheri Bridge Collapse: ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Andheri Bridge Collapse: ब्रिटिशकालीन पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Next

मुंबई : अंधेरी रेल्वेमार्गावरील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील ब्रिटिशकालीन व जुन्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रँट रोड येथील पुलालाही तडे गेल्याने, याचे तीव्र पडसाद स्थायी समितीत बुधवारी उमटले. मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असलेल्या दादरच्या टिळक व एल्फिन्स्टन पुलालाही हादरे बसत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे धोकादायक पुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाºयाची चौकशी करून कारवाई करावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक १३ तासांनी सुरू झाली. याचा परिणाम मध्य व हार्बर मार्गावर, तसेच रस्ते वाहतुकीवरही झाला. ही घटना ताजी असतानाच, बुधवारी ग्रँट रोड स्टेशनजवळच्या पुलाला तडे गेले. त्यामुळे मुंबईतील जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे संतप्त नगरसेवकांनी प्रशासनाला स्थायी समितीत धारेवर धरले. अंधेरी पुलाच्या जबाबदारीवरून पालिका आणि रेल्वेमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. या घटनेने महापालिकेची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. या मुद्द्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन करून प्रशासनाला धारेवर धरले. अंधेरीतील पुलाची मालकी पालिकेची आहे. मात्र, हा पूल रेल्वेच्या हद्दीत असल्याने देखभाल रेल्वेनेच करायला हवी. पालिका यासाठी पैसे देते, असा खुलासा प्रशासनाने स्थायी समितीत करून, पुन्हा जबाबदारी झटकल्याने नगरसेवक संतापले. मग उपयोगिता सेवा म्हणजे केबल, मोबाइल सेवांसाठी पालिका परवानगी का देते, असा सवाल नगरसेवकांनी विचारला. त्यावर प्रशासनाने समाधानकारक उत्तर दिले नाही. मुंबईतील इतर पुलांची स्थितीही अशीच आहे. याकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांची चौकशी करून कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी बैठकीत केली.

अधिकाºयांना निष्काळजी भोवणार
रेल्वेच्या हद्दीतील पूल पालिकेचे असले, तरी त्याच्या देखभालीची जबाबदारी रेल्वेची असते. आम्ही पैसे देतो, त्यामुळे त्यांनी देखभाल करणे अपेक्षित आहे, असे पूल विभागाचे मुख्य अभियंत्या शीतला प्रसाद कोरी यांनी सांगितले.
मात्र, एवढी मोठी दुर्घटना घडूनही पालिका प्रशासन व रेल्वे जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत असतील, तर मग याला जबाबदार कोण? याबाबत चौकशी करून संबंधित अधिकाºयावर कारवाई करावी. याबाबतचा अहवाल पुढच्या बैठकीत माहिती द्यावी, असे निर्देश अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

टिळक व एल्फिन्स्टन पूलही धोकादायक
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील इतर जुन्या पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दादर येथील टिळक ब्रिज व एल्फिन्स्टन ब्रिज हे शंभर वर्षांहून जुने आहेत. टिळक ब्रिज हा मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरून जातो. यावर रोजची वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. या पुलाला हादरे बसत असतानाही पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. एल्फिन्स्टन ब्रिजची स्थितीही तशीच आहे, तसेच झेड ब्रिजही धोकादायक झाला आहे. हे पूल पडल्यानंतर पालिका दखल घेणार का, असा संतप्त सवाल सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला.

Web Title: Andheri Bridge Collapse: The question of security for the British bridge bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.