मुंबई- १६६, अंधेरी ( पूर्व ) विधानसभा मतदारसंघात येत्या ३ नोव्हेंबरला येथील दिवंगत आमदार कै. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने स्वीकारला. त्यानंतर अंधेरी पूर्व मालपा डोंगरी क्रमांक ३ गणेश मंदिर येथे निवडणुकीचा नारळ फोडला. येथून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मग त्यांनी अंधेरी पूर्व, गुंदवली म्युनिसिपल शाळा (मांजरेकर वाडी) या ठिकाणी आपला निवडणूक अर्ज भरला.
यावेळी माजी मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री व विभागप्रमुख अँड. अनिल परब, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार-विभागप्रमुख सुनील प्रभू, आमदार रवींद्र वायकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मुंबई काँग्रेसचे कार्यध्यक्ष चरणजीत सप्रा, माजी मंत्री सुरेश शेट्टी, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट,काँगेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,कम्युनिस्ट पार्टी आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी येथे शक्तिप्रदर्शन करत मोठी गर्दी केली होती.यावेळी महिलांची गर्दी तर लक्षणीय होती. आदित्य ठाकरे म्हणाले की,ए खाद्या महिलेला इतका त्रास, “हे तर निर्दयी, काळ्या मनाचं खोके सरकार असून ही ‘माणुसकी विरुद्ध खोकासूर’ अशी लढाई आहे.