अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 04:21 PM2024-10-26T16:21:03+5:302024-10-26T16:22:07+5:30

Andheri East Assembly 2024 News: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार ऋजुता लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीत भाजपने मुरजी पटेल हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून लढणार आहेत. 

Andheri East Assembly election candidates rutuja latke vs murji patel Shiv sena vs Shiv sena ubt | अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

मनोहर कुंभेजकर, मुंबई
Maharashtra Assembly Election 2024 Latest News: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की भाजपला मिळणार? अशी चर्चा महायुतीत गेले काही दिवस रंगली होती. या चर्चेला आता याला पूर्णविराम मिळाला असून, मुंबई भाजप उपाध्यक्ष व माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना शिंदेंच्या शिवसेनेतून उमेदवारी मिळणार असून ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, त्यांना शिंदे सेनेतून उमेदवारी देण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा कंदील दिला आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून विद्यमान आमदार ऋतुजा लटके यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले. त्यामुळे आता अंधेरी पूर्वमध्ये ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेनेत चुरशीची लढत होणार आहे.

शिवसेनेचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या निधनानंतर २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर ऋतुजा लटके विजयी झाल्या होत्या.

कोण आहेत मुरजी पटेल?

काका या नावाने अंधेरी पूर्व भागात परिचित असलेले मुरजी पटेल हे परिचित आहे. त्यांनी २०२२ मध्ये पोटनिवडणुकीसाठी निवडणूक अर्ज भरला होता.  मात्र राज्यात एखाद्या घरातील लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची राजकीय संस्कृती आहे. हीच संस्कृती कायम ठेवावी आणि निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर भाजप-शिवसेना महायुतीने या निवडणुकीतून माघार घेतली होती.

स्वीकृती शर्मा अपक्ष लढणार?

या मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या इच्छुक होत्या. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर पी.एस.फाउंडेशनच्या माध्यमातून मतदारसंघात संपर्क वाढवला होता. मात्र, आता शिंदेंच्या शिवसेनेतून तिकीट मिळणार नसल्याने, त्या येथून अपक्ष निवडणूक लढवणार का? अशी मतदार संघात चर्चा आहे.

Web Title: Andheri East Assembly election candidates rutuja latke vs murji patel Shiv sena vs Shiv sena ubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.