Andheri East by-election: अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

By मनोहर कुंभेजकर | Published: October 28, 2022 07:55 PM2022-10-28T19:55:28+5:302022-10-28T19:56:21+5:30

Andheri East by-election: आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

Andheri East by-election: Training of polling station level staff completed for Andheri East by-election | Andheri East by-election: अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Andheri East by-election: अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - येत्या दि,३ नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षणादरम्यान देण्यात आलेल्या माहितीचा व प्रात्यक्षिकांचा उपयोग हा काटेकोरपणे, वेळच्या वेळी व शिस्तबद्धरीत्या करावा", असे निर्देश या निवडणुकीसाठी नियुक्त केंद्रीय निरीक्षक देवेश देवल (भा.‌ प्र. से.) यांनी दिले आहे. 

आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. विलेपार्ले पूर्व परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण कटाळे, निवडणूक प्रक्रिया विषय तज्ज्ञ मार्गदर्शक तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र हजारे यांनी देखील मार्गदर्शन केले. सकाळी व दुपारी अशा दोन तुकड्यांमध्ये आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात सुमारे १ हजार ५०० इतक्या संख्येतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
..
यंदाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य सांगताना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले की, आज आयोजित द्विस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम हा दोन‌ ठिकाणी घेण्यात आला. प्रशिक्षणाचा पहिला भाग हा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे घेण्यात आला. या अंतर्गत उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना संगणकीय सादरीकरणाच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले. तर यानंतर आजच्या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे आयोजन हे विलेपार्ले पूर्व परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दीक्षित रोड महानगरपालिका शाळा संकुल येथे करण्यात आले होते. या शाळेमध्ये असणाऱ्या वर्गखोल्यांचे सूक्ष्मस्तरीय सुनियोजिन करून या ठिकाणी मतदान प्रक्रियेबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ - अंधेरी पूर्व' विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही येत्या दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून दि. ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. तर मतदारसंघात २ लाख ७१ हजार ५०२ मतदार आहेत. या निवडणुकीची सर्व प्रक्रिया ही मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संबंधित नियमांनुसार होत आहे. या मध्ये प्रामुख्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, यंत्रसामग्री तपासणे व यंत्रसामग्री सिलबंद करणे, मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे आदी विविध स्तरीय बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी असणारे 'मायक्रो ऑब्जरव्हर' यासह समन्वय अधिकारी, विविध चमूंमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण टप्पेनिहाय पद्धतीने देण्यात येत आहे. याच अंतर्गत आज मतदान केंद्र स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी 'अंधेरी पूर्व' मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी आवर्जून केले आहे.
 

Web Title: Andheri East by-election: Training of polling station level staff completed for Andheri East by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.