Join us

अंधेरी-घाटकोपर पुलामुळे वाहनांचा वेग वाढला; अपघात टाळण्यासाठी रस्ते वाहतुकीत बदल  

By नितीन जगताप | Published: September 10, 2023 8:02 PM

अंधेरी-घाटकोपर पुलाच्या बांधकामामुळे  वाहनांचा वेग वाढला असून अपघात  घडण्याची शक्यता आहे.

मुंबई :  अंधेरी-घाटकोपर पुलाच्या बांधकामामुळे  वाहनांचा वेग वाढला असून अपघात  घडण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी - दक्षिणेला रविवारपासून पुढील आदेशापर्यंत रस्ते  वाहतुकीत  बदल करण्यात आला आहे अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. 

अंधेरी-घाटकोपर मार्गावरील दक्षिण वाहिनीच्या पुलाचे काम पुर्ण झाले असून घाटकोपरकडून अंधेरीकडे जाणारी वाहतूक जलदगतीने येत आहे. त्यामुळे जागृतीनगरकडून नरसी मेहता मार्गाचा वापर करून एलबीएस मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर जागृतीनगर मेट्रो स्टेशनकडून नरसी मेहता मार्गाचा वापर करून लाल बहादुर शास्त्री मार्गाकडे जाणारी वाहतूक बंद करून फक्त लालबहादुर शास्त्री मार्गाकडून नरसी मेहता मार्गावरून जागृतीनगर मेट्रो स्टेशनकडे जाणारा अंधेरी-घाटकोपर मार्गावरील उत्तर वाहीनीची वाहतुक सुरू ठेवणे आवश्यक आहे.   अंधेरी-घाटकोपर पुलाच्या बांधकामामुळे वाहनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता टाळण्यासाठी  वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याबाबत घाटकोपर वाहतूक विभाग यांचेकडून अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर  नागरिकांना होणारा धोका , 

अडथळा तसेच गैरसोय टाळण्यासाठी  १० सप्टेंबरपासुन पुढील आदेशापर्यंत खालील परिसरात कायमस्वरूपी वाहतूक बदल करण्यात येत आहे.  एम. रामकुमार, अपर पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग एक दिशा मार्ग 

१) लालबहादुर शास्त्री मार्गावरील नरसी मेहता जंक्शनवरून नरसी मेहता मार्गाने जागृतीनगर मेट्रो स्टेशनमार्गे अंधेरीकडे जाणारी दक्षिण वाहीनीची वाहतुक ही पुर्णपणे एक दिशा मार्ग राहील.... रस्ता वाहतूकीकरीता बंद

२) शिवसेना शाखा क्रमांक १२९ कडून जागृती नगर मेट्रो स्टेशनकडून नरसी मेहता मार्गाने उत्तर वाहीनीने लालबहादुर शास्त्री मार्गाकडे येणारी वाहतुक हि सर्व प्रकारच्या वाहनांकरीता २४ तास पुर्णपणे बंद राहील.

पर्यायी मार्ग ३) शिवसेना शाखा क्रमांक १२९ कडून जागृतीनगर मेट्रो स्टेशनकडून नरसी मेहता मार्गाने उत्तर बाहीनीने लालबहादुर शास्त्री मार्गाकडे येणारी वाहतुक हि अंधेरी घाटकोपर लिंक मार्गाचे उत्तर बाहीनीने लिंक रोड जंक्शन / श्रेयस जंक्शनला येवून उजवे वळण घेवून लालबहादुर शास्त्री मार्गाचा वापर करून दक्षिण वाहीनीने आर.बी. कदम मार्ग जंक्शन नरसी मेहता जंक्शनकडे मार्गक्रमण करतील.