मुंबईतीलमेट्रो-१ म्हणजेच अंधेरी-घाटकोपर (Andheri Ghatkopar Metro 1) मार्गावरील एका मेट्रोत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो सेवा उशिराने सुरू आहे. मेट्रोचं वेळापत्रक ऐन गर्दीच्या वेळी कोलमडल्यामुळे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे आणि प्रवाशांचे हाल झाले आहेत.
अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी सेवा ठरते. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाला ही सेवा जोडलेली असल्याने सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात प्रवासी अंधेरी ते घाटकोपर या मार्गावर प्रवास करतात. चकाला, साकिनाका, मरोळ या भागात अनेक कॉर्पोरेट कार्यालयं असल्यानं सकाळच्या वेळेत कर्मचाऱ्यांची मेट्रोसाठी प्रचंड गर्दी असते. मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो सेवा २० ते २५ मिनिटं उशिराने सुरू आहे.