Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:11 AM2024-09-19T11:11:03+5:302024-09-19T11:14:24+5:30

Andheri Lokhandwala Fire: अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात सेकंड क्रॉस लेनमध्ये दोन बंगल्यांना भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Andheri Lokhandwala Fire Two bungalows gutted in massive fire | Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक

Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक

Andheri Lokhandwala Fire: अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात सेकंड क्रॉस लेनमध्ये दोन बंगल्यांना भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन्ही बंगले आगीत जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील बंगला क्रमांक ११ मध्ये आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेल्याचं सांगण्यात येत आहे. बंगल्यात कुणीही राहात नव्हतं त्यामुळे जीवितहानीचा धोका टळल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. घटनास्थळावर अग्निशमन दलासोबतच रुग्णवाहिका, अदानी इलेक्ट्रिक, महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत.

 

Read in English

Web Title: Andheri Lokhandwala Fire Two bungalows gutted in massive fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.