अंधेरीचा राजा महाकालेश्वर मंदिराच्या देखाव्यात विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 07:03 PM2019-09-02T19:03:43+5:302019-09-02T19:05:32+5:30

धेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. यंदा अंधेरीचा राजाचे ५४ वे वर्ष आहे.

Andheri's Ganpati sits in the Mahakaleshwar temple | अंधेरीचा राजा महाकालेश्वर मंदिराच्या देखाव्यात विराजमान

अंधेरीचा राजा महाकालेश्वर मंदिराच्या देखाव्यात विराजमान

Next

-  मनोहर कुंभेजकर
मुंबई- सर्वच सार्वजनिक गणपतीचे विसर्जन जवळजवळ अनंत चतुर्थीला होते.मात्र याला अंधेरी पश्चिम आझाद नगर मेट्रो स्टेशन जवळ असलेला अंधेरीचा राजा आहे.आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती तर्फे साजरा होणाऱ्या अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. यंदा अंधेरीचा राजाचे ५४ वे वर्ष आहे.

1 966 साली टाटा स्टील आणि एक्सेल इंडस्ट्रीच्या कामगारांनी आझाद नगर उत्सव समितीच्या माध्यमातून अंधेरीच्या राजाची स्थापना केली होती.नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला  दररोज हजारो गणेश भक्त महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून येतात.आज सकाळी वाजत गाजत अंधेरीच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

दरवर्षी देशातील प्रसिद्ध मंदिरांचे हुबेहूब देखावे साकार करणाऱ्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीने यंदा मध्यप्रदेशच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा हुबेहूब देखावा साकार केला असून ८.५ फूटांची अंधेरीच्या राजाची मूर्ती येथे विसावली असल्याची माहिती आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि पालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर(शैलेश)फणसे यांनी दिली.

अंधरीच्या राजाचा प्रत्येक दिवसाचा धोतर व शाल हा पेहराव हा अमेरिकेतील प्रसिद्ध बॉलीवुड फॅशन डीझायनर श्रीमती साई सुमन साकार करत आहे.आज पहिल्या दिवशी अंधेरीच्या राजाचा पेहराव पिवळे धोतर व गुलाबी शाल असा होता.यंदा त्या खास अंधेरीच्या राजाची कार्यकर्ते म्हणून सेवा करण्यासाठी येथे आल्या असून त्या लहानपणापासून अंधेरीच्या राजाच्या भक्त आहेत अशी माहिती समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस व सह खजिनदार सचिन नायक यांनी दिली.

अंधेरीच्या राजाच्या आकर्षक पेहरावा बरोबरच अंधेरीच्या राजाला समितीकडे असलेल्या 3 किलो आणि सुमारे 1.25 कोटी सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष केशव तोंडवळकर व सचिव विजय सावंत यांनी दिली.

2014 पासून आझाद नगर उत्सव समितीने अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांसाठी ड्रेसकोड लागू केला आहे.तोकडे कपडे,मिनी स्कर्ट व हाफ पॅन्ट घालून अंधेरीच्या राजाचे दर्शन घेता येणार नाही अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष महेंद्र घेडिया व उदय सलीयन यांनी शेवटी दिली.

Web Title: Andheri's Ganpati sits in the Mahakaleshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.