Join us

आंगणेवाडी जत्रेसाठी रेल्वे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 5:20 AM

कोकणातील आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेसाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात जातात. यात्रेच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य आणि कोकण रेल्वेने एकत्र येत दोन विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे ७ जानेवारीपासून करता येईल.

मुंबई  - कोकणातील आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेसाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात जातात. यात्रेच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य आणि कोकण रेल्वेने एकत्र येत दोन विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे ७ जानेवारीपासून करता येईल.२६ जानेवारी रोजी पहिली विशेष एक्स्प्रेस धावेल. ट्रेन क्रमांक ०११६१ ही विशेष एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी या मार्गावर धावेल. ती एलटीटी स्थानकातून मध्यरात्री १.१० वाजता सुटणार असून सावंतवाडी रोड स्थानकात सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. (०११६२) ही एक्स्प्रेस सावंतवाडी रोडवरून दुपारी १२.३० वाजता रवाना होणार असून ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर ती थांबेल. १३ शयनयान बोगींसह वातानुकूलित ३-टायर आणि द्वितीय दर्जाच्या प्रत्येकी ३ बोगी आणि वातानुकूलित २-टायरची एक बोगी एक्स्प्रेसला जोडण्यात येणार आहे.(०११५७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी ही दुसरी एक्स्प्रेस २७ जानेवारीला सुटेल. सीएसएमटी स्थानकातून मध्यरात्री १२.२० मिनिटांनी रवाना होऊन सावंतवाडी येथे सकाळी १० वाजता पोहोचेल. या एक्स्प्रेसचा परतीचा प्रवास (०११५८) दुपारी २ वाजता सावंतवाडी येथून सुरू होईल आणि रात्री ११.५५ मिनिटांनी ती सीएसएमटी येथे पोहोचेल. ती दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. २० बोगींच्या एक्स्प्रेसध्ये ५ शयनयान बोगींसह ८ द्वितीय दर्जाच्या बोगी आणि वातानुकूलित ३-टायरच्या ५ बोगींचा समावेश असणार आहे.

टॅग्स :कोकण रेल्वेभारतीय रेल्वे