Join us

अंगणवाडी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 5:07 AM

‘बजेट वाढवा, अंगणवाडी वाचवा’ या प्रमुख मागणीसह अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

मुंबई  - ‘बजेट वाढवा, अंगणवाडी वाचवा’ या प्रमुख मागणीसह अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. राज्य शासनाकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघटनेने २५ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.समितीच्या निमंत्रक शुभा शमीम म्हणाल्या की, राज्य सरकारने १६ जुलैला घेतलेल्या शासन निर्णयामुळे बऱ्याच अंगणवाड्या बंद होण्याची भीती आहे. त्याचा परिणाम संबंधित विभागातील लहान मुलांसह स्तनदा मातांवर होणार आहे. या निर्णयानुसार राज्यातील ज्या अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटातील २५हून कमी मुले आहेत, त्या बंद करण्यात येतील. मात्र हा निर्णय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याचा अरोप शमीम यांनी केला आहे.ग्रामीण भागातील दोन अंगणवाड्यांमध्ये बºयाचे किमीचे अंतर असते. त्यामुळे शासनाच्या तुघलकी निर्णयामुळे पोषण आहारासह सर्वच योजनांना मुलांना मुकावे लागेल. आदिवासी पाड्यांतील कुपोषित मुलांची संख्या या निर्णयामुळे मोठ्या संख्येने वाढण्याची भीतीही संघटनेने व्यक्त केली आहे. याशिवाय आॅक्टोबर महिन्यापासून मानधनवाढीचे आश्वासन देणाºया सरकारने राज्यातील एकात्मिक बाल विकास योजनेच्या निधीत वाढ करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.प्रमुख मागण्याअंगणवाडी केंद्र बंद करण्याचा आदेश कायमस्वरूपी रद्द करावा.आयसीडीएसचे खासगीकरण करू नका.थेट सशर्त रोख रक्कम हस्तांतरण आणि पाकीटबंद आहाराचे पाऊल मागे घ्या.एका महिन्याच्या मानधनाएवढी रक्कम भाऊबीज म्हणून द्या.गणवेशासाठी २ हजार रुपये देण्यात यावेत.सेवासमाप्तीच्या लाभाच्या रकमेत तीन पटीने वाढ करावी.

टॅग्स :महाराष्ट्रबातम्या