अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 09:32 AM2018-04-03T09:32:35+5:302018-04-03T09:32:35+5:30

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त राज्यातील गणेश मंदिरांमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Angarki sankashti chaturthi today Siddhivinayak Mandir Mumbai | अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

Next

मुंबई - अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त राज्यातील गणेश मंदिरांमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबईतील प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरातही सोमवारी (2 एप्रिल) रात्रीपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. 
सोमवारी मध्यरात्री रात्री 12.15 वाजल्यापासून सिद्धिविनायकाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गणपती बाप्पाची विशेष पूजा बांधण्यात आली. मंदिराला आकर्षक रोषनाईसह विविध रंगीबेरंगी फुलांची आरास घालून सजवण्यात आलं. दर्शनासाठी पुरुष आणि महिला भाविकांसाठी वेगवेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातूर मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

दरम्यान, अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. सोबतच मंदिर प्रशासनाकडून भक्तांच्या सोयीसाठी दादर, एल्फिन्स्टन स्थानकाहून मोफत बस सेवा पुरवण्यात येत आहेत.

भाविकांसाठी सूचना
- सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी येताना सोबत मौल्यवान वस्तू नेऊ नयेत.
- भाविकांनी सोबत लॅपटॉप, कॅमेरे व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेऊ नयेत.
 

Web Title: Angarki sankashti chaturthi today Siddhivinayak Mandir Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.