तोकड्या कपड्यांबाबतच्या आदेशाने ‘जेजे’तील विद्यार्थिनींमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 02:45 AM2019-03-25T02:45:59+5:302019-03-25T02:46:36+5:30

मुलींनी कोणते कपडे घालावेत किंवा घालू नयेत, यासारख्या घटना यापूर्वीदेखील मुंबईत समोर आल्या आहेत.

 The anger against the students of JJ in order to order the clothes | तोकड्या कपड्यांबाबतच्या आदेशाने ‘जेजे’तील विद्यार्थिनींमध्ये संताप

तोकड्या कपड्यांबाबतच्या आदेशाने ‘जेजे’तील विद्यार्थिनींमध्ये संताप

Next

मुंबई : तोकडे कपडे घालून विद्यार्थिनींनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये येऊ नये, तसेच सुरू असलेल्या ‘अस्तित्व’ युवा महोत्सवात अशा कपड्यात येऊ नये, असा फतवा जे.जे. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या नावे जे.जे. शासकीय महाविद्यालयाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये फिरत आहे. मात्र, कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी याचा तीव्र निषेध केला असून, महाविद्यालय प्रशासनाने अशी कारवाई केल्यास उत्तर देण्याचा निर्धार केला आहे.
मुलींनी कोणते कपडे घालावेत किंवा घालू नयेत, यासारख्या घटना यापूर्वीदेखील मुंबईत समोर आल्या आहेत. शिवाय, महाविद्यालयाने काढलेले अजब फतवे आता काही नवीन नाहीत. असाच फतवा जे. जे. मेडिकल कॉलेजच्या वॉर्डन शिल्पा पाटील यांच्या नावाने महाविद्यालयाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फिरत आहे. १८ मार्चपासून जेजेमध्ये महाविद्यालयाचा ‘अस्तित्व’ हा महोत्सव सुरू आहे, पण शुक्रवारी हॉस्टेलच्या वॉर्डनकडून अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांच्या नावाने मेसेज फॉरवर्ड करण्यात आला.
ज्यामध्ये फेस्टिव्हलमध्ये मुलींनी तोकडे कपडे घालू नयेत, असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरच न थांबता त्यामध्ये मुलींनी रात्री १० वाजण्यापूर्वी हॉस्टेलला परत यायला पाहिजे, मुले आणि मुलींनी वेगळे बसावे, मुले-मुलींनी एकत्र डान्स करू नये, असे नियम आखून देण्यात आले आहेत, तर मुलांना मात्र कितीही वाजता परत येण्याची मुभा देण्यात आली आहे.
या अजब फतव्याला विद्यार्थ्यांनी मात्र कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, हे नियम चुकीचे असून
नवीन अधिष्ठाता आणि वॉर्डन यांचे हे नियम आहे, अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली. अंजलीने नुकतीच आपली इंटर्नशिप पूर्ण केली असली, तरी अद्याप ती फेस्टिव्हलचा भाग आहे़

या आधीच्या कार्यक्रमात मुलींचा गोंधळ
जे. जे. रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना विचारले असता, या पूर्वीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता. कॅम्पसमध्ये इतरही डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांची ये-जा असते. डॉक्टरांनी डॉक्टरांप्रमाणे राहावे, म्हणून हा संदेश काढण्यात आला आहे. यापूर्वी कार्यक्रमात झालेल्या गोंधळाची चौकशी करण्यात येणार आहे.

- मुलींनी रात्री १० वाजण्यापूर्वी हॉस्टेलला परत यायला पाहिजे, मुले आणि मुलींनी वेगळे बसावे, मुले-मुलींनी एकत्र डान्स करू नये, असे नियम आखून देण्यात आले आहेत. मुलांना मात्र कितीही वाजता परत येण्याची मुभा या फतव्यामध्ये देण्यात आली आहे़ याला विद्यार्थिनींचा विरोध आहे़

Web Title:  The anger against the students of JJ in order to order the clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई